हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘चला हवा येऊ द्या’ च्या माध्यमातून घराघरात आणि मनामनांत पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे ती अनेकदा विविध कॉमिक रील, विविध लूक, व्हॅकेशन, फॅमिली फोटो आपल्या चाहत्यांसह शेअर करत असते. याहीवेळी तिने सोशल मीडियावर काही फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. पण झालं असं कि, फोटो तर तिने शेअर केले. पण व्हिडीओ..? व्हिडीओ मात्र जबरदस्ती शेअर करून घेतलाय. तो हि कुशल बद्रिकेने. याच सविस्तर स्पष्टीकरण तिने सोशल मीडियावर हि व्हिडीओ पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये दिलं आहे.
अभिनेत्री श्रेया बुगडेने हा व्हिडीओ तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘कुशल बद्रिकेने माझ्या फोन मधून माझे फोटो जबरदस्तीने घेऊन, त्याचा 1 video बनवला आहे, आणि मला तो post करण्याची जबरदस्ती केली आहे, म्हणुन मी हा video post करत आहे. पण तुम्हाला Like आणि comments करण्याची जबरदस्ती तो करू शकत नाही. म्हणुन मी देवाचे आभार मानते.’ या व्हिडिओवर अनेक नेटिझन्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतकेच काय तर कुशल बद्रिकेनेसुद्धा कमेंट केली आहे.
या व्हिडिओवर कमेंट करीत कुशल बद्रिके म्हणतोय कि, ‘वा.. वा…. काय जबरदस्त video केलाय मी, शाब्बास रे माझा मला.’ यावर श्रेया म्हणतेय कि, ‘ हा व्हिडीओ जबरदस्त कमी आणि जबरदस्ती जास्त झालाय.’ याशिवाय अनेकांनी खरंच व्हिडीओ छान असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘जबरदस्तीने जबरदस्त जबरा जॉब’. तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘छान व्हिडीओ नक्कीच शेअर केला, म्हणून त्याला आणि तुला अभिनंदन’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘मला माहित आहे हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे.’ अशाप्रकारे अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत व्हिडीओ छान असल्याचे म्हटले आहे.
Discussion about this post