हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रविवारपासून मराठी सिने विश्वातील लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा खेळ १०० दिवस रंगणार. याहीवेळी एक दोन नव्हे तर तब्बल १६ स्पर्धकांनी या खेळात सहभाग घेतला आहे. प्रत्येकाने घरात प्रवेश केल्यानंतर आता पुढे काय होणार अशी सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली होती. पण स्पर्धकांना कुठे धीर आहे. घरात पाय टाकला काय आणि भांडले काय..? अशी गट सौरभ आणि अपूर्वाची झाली.
बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी प्रसाद जवादे आणि अपूर्वा नेमळेकर भिडल्याचे दिसले. त्याच काय झालं., यावेळी स्पर्धकांआधी बिग बॉसनेच खेळायला सुरुवात केली आहे. म्हणजे पहिल्याच दिवशी बिग बॉसने या १६ जणांमध्ये चार ग्रुप केले. त्यानुसार प्रत्येक गटात ४ खेळाडू आहेत. आता या खेळाडूंनी मिळून आपल्या गटात कोणता खेळाडू निरुपयोगी आहे हे ठरवायचं असा एक टास्क बिग बॉसने दिला आहे. यानुसार सगळ्यांनी आपापली मत मांडली आणि मग काय सगळ्यांची कुणा न कुणासोबत जुंपलीच. नुकताच वाहिनीने एक प्रोमो रिलीज केला. ज्यामध्ये अपूर्वा आणि प्रसादाची तू तू मैं मैं पहायला मिळाली.
या प्रोमोमध्ये बिग बॉस आपल्या आवाजात म्हणतात कि, प्रत्येक गटातील चारही सदस्यांनी मिळून ठरवायचं आहे की आपल्या गटातील कोणता खेळाडू निरुपयोगी आहे. बिग बॉसच्या या आदेशानंतर ग्रुप ग्रुपमध्ये चर्चा होते. त्यानंतर सामान्य नागरिक म्हणून घरात एंट्री मिळवलेला त्रिशूल म्हणतो आपल्या गटात किरण माने निरुपयोगी आहेत, कारण आपण तरुण आहोत. त्यावर किरण माने म्हणतात मी काय म्हातारा वाटलो की काय..? तर दुसरीकडे अपूर्वा म्हणते मला प्रसाद जवादे निरुपयोगी वाटतो. मी इथे कुणाचीही मनं जपायला आलेली नाहीय. यावरून दोघांमध्ये चांगलीच जुंपते.
Discussion about this post