हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रविवारी तब्बल १६ स्पर्धकांनी बिग बॉस मराठीच्या घरात दमदार एंट्री घेतली. यामध्ये अपूर्वा नेमळेकर, किरण माने, तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, निखिल राजेशिर्के, अमृता धोंगदे, समृद्धी जाधव, अक्षय केळकर, योगेश जाधव, अमृता देशमुख, यशश्री मसूरकर, विकास सावंत, मेघा घाडगे, त्रिशूल मराठे, रुचिरा जाधव, डॉ. रोहित शिंदे या कलाकारांचा समावेश आहे. यातील काही चेहरे परिचित तर काही नवे आहेत. यांपैकी काही चेहरे आणि वाद यांचा तर गहिरा संबंध आहे. जसं कि किरण माने. आता बिग बॉसच्या घरातही त्यांची सुरुवात अशीच काहीशी झाली आहे.
बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी स्पर्धकांआधी बिग बॉसने खेळी टाकली. झालं असं कि, बिग बॉसने या १६ जणांमध्ये एकूण चार असे ग्रुप केले. त्यानुसार प्रत्येक गटात ४-४ खेळाडू आहेत. आता या खेळाडूंनी मिळून आपल्या गटात कोणता खेळाडू निरुपयोगी आहे हे ठरवायचं असा एक जबरदस्त टास्क बिग बॉसने दिला आहे. यानुसार सगळ्यांनी आपापली मत मांडली आणि मग काय सगळ्यांची कुणा न कुणासोबत जुंपलीच. नुकताच वाहिनीने एक प्रोमो रिलीज केला. ज्यामध्ये किरण माने यांचा ग्रुप त्यांना तरुण नाही म्हणून निरुपयोगी ठरवताना दिसतोय. तर दुसरीकडे अपूर्वा आणि प्रसाद यांच्यातही तू तू मैं मैं होतेय.
या प्रोमोमध्ये बिग बॉस आपल्या आवाजात म्हणतात कि, प्रत्येक गटातील चारही सदस्यांनी मिळून ठरवायचं आहे की आपल्या गटातील कोणता खेळाडू निरुपयोगी आहे. बिग बॉसच्या या आदेशानंतर ग्रुप ग्रुपमध्ये चर्चा होते. त्यानंतर सामान्य नागरिक म्हणून घरात एंट्री मिळवलेला त्रिशूल आपले मत मांडताना म्हणतो कि, आपल्या गटात किरण माने निरुपयोगी आहेत. याचे कारण म्हणजे यांना सोडून आपल्या ग्रुपमध्ये आपण सगळेच तरुण आहोत. त्यावर किरण माने म्हणतात मी काय म्हातारा वाटलो की काय..? तर दुसरीकडे अपूर्वा प्रसाद जवादेला निरुपयोगी ठरवते. यावरून दोघांमध्ये चांगलीच जुंपते.
Discussion about this post