हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । टीव्हीवर लागणारी कसौटी जिंदगी ही मालिका म्हटलं कि सर्वांना त्यामधील प्रेरणा लगेच आठवते. या प्रेरणा नावाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रीला तेव्हा खूपच लोकप्रियता मिळाली होती. ती प्रेरणा म्हणजेच श्वेता तिवारी (Shweta Tiwari) होय. एकेकाळी फक्त ५०० रुपयांची नोकरी करणारी श्वेता आज करोडोंची मालकीण आहे. आज आपण सविताच्या आयुष्याविषयी अन तिच्या एकूण कमाईबाबत (Shweta Tiwari Net Worth) जाणून घेउयात.
श्वेता तिवारीच्या तरुणपणाबद्दल अनेकांना आश्चर्य
श्वेताचा चाहता वर्ग खूपच मोठा आहे. श्वेताची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. श्वेताच्या तरुण दिसण्याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. श्वेता सध्या आजी आहे. तिला एक नातं सुद्धा आहे. अनेकदा ती आपली मुलगी अन नातीसोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
फक्त 500 रुपयात करायची काम
श्वेता तिवारीचा जन्म उत्तर प्रदेशातील प्रतापगड या छोट्याशा गावात झाला. श्वेताला सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. आपलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी श्वेताने खूप मेहनत घेतली. तिच्या कष्टाचं फळ तिला नक्कीच मिळालंय असं आपण तिझ करिअर पाहून म्हणू शकतो. श्वेता जेव्हा १२ वर्षांची होती तेव्हा तिने पहिली नोकरी एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये केली. तेव्हा तिला फक्त ५०० रुपये पगार मिळत असे. आजच्या दिवसाबद्दल बोलायचे झाले तर आज ही अभिनेत्री करोडोंची मालकिन आहे.
बिग बॉसचा विजेता
2004 मध्ये श्वेता तिवारीने बिपाशा बसूच्या ‘मधोशी’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती फिल्म इंडस्ट्रीत पुढे जात राहिली. श्वेता तिवारीने सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस सीझन 4 देखील जिंकला आहे.
अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये श्वेताची भूमिका
श्वेता तिवारीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. यामध्ये कसौटी जिंदगी की, मेरे पिता की दुल्हन, बाल वीर, जाने क्या बात हुई, कहानी घर घर की, अविजक आदींचा समावेश आहे. याशिवाय श्वेताने अनेक रिअॅलिटी शो होस्ट केले आहेत. यातून श्वेताने बक्कळ कमाई केली आहे.
श्वेता तिवारीची निव्वळ संपत्ती (Shweta Tiwari Net Worth)
रिपोर्ट्सनुसार, श्वेता एका एपिसोडसाठी 60 ते 70 लाख रुपये फी घेते. त्याच वेळी, तिची एकूण संपत्ती सुमारे 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 74.84 कोटी आहे. टीव्ही शो व्यतिरिक्त, श्वेता जाहिराती आणि ब्रँड प्रमोशनद्वारे देखील लाखोंची कमाई करते. श्वेताकडे अनेक महागडी लक्झरी वाहने आहेत ज्यात Audi A4, Hyundai Santro आणि BMW 7 Series 730Ld सारखी वाहने आहेत.
Discussion about this post