हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस या शोकडे पाहिले जाते. हा शो विविध भाषेत विविध सेलिब्रिटी होस्ट करतात. जसे कि हिंदी बिग बॉस अभिनेता सलमान खान तर मराठी बिग बॉस दिग्दर्शक महेश मांजरेकर होस्ट करताना दिसतात. नुकतेच हे दोन्ही भाषेतील बिग बॉस सुरु झाल्यामुळे प्रेक्षक वर्ग एकीकडे खुश तर दुसरीकडे नाराज आहेत. याचे कारण म्हणजे शिव ठाकरे. मराठी बिग बॉस सिजन २ चा विजेता शिव ठाकरे हा यंदाच्या बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. यामुळे शिव ठाकरेबाबत प्रेक्षकांनी आपली नाराजी दर्शवली आहे.
बिग बॉस मराठीच्या सीजन २ मध्ये पूर्ण १०० दिवस घरात राहून शिव ठाकरेने हा सीजन जिंकला. यानंतर यंदाच्या बिग बॉस १६ मध्ये तो सहभागी झाला आहे. मुख्य म्हणजे त्याच्या एंट्रीवेळी त्याने मराठी बिग बॉस मागे ठेवून आलोय असे विधान केले होते. यावरून आधीच प्रेक्षक चिडले असताना आता बिग बॉसचा खेळ सुरु झाला असताना तो फारसा कुठे दिसत नाही अशी तक्रार लोक करत आहेत. इतकेच काय तर बिग बॉस मराठी जिंकल्यावर पुन्हा हिंदीत का जाता..? असाही प्रश्न अनेकांनी विचारला आहे.
याआधी मराठी बिग बॉस सीजन १ ची विजेती मेघा धाडेदेखील बिग बॉस हिंदीच्या १२ व्या पर्वात दिसली होती. दरम्यान मेघा मराठी बिग बॉस तर जिंकली पण हिंदीत काही फार काळ टिकू शकली नाही. यामुळे नेटकऱ्यांनी तिलाही चांगलेच ट्रोल केले होते.
यानंतर आता शिव ठाकरेही असाच मराठी बिग बॉसमधून हिंदीत आल्यामुळे मराठी प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे शिवचा चाहता वर्ग मात्र त्याला पाहून भलताच आनंदी झाला आहे. इतकेच काय तर शिवचे चाहते आपला माणूसच जिंकणार असेही बोलताना दिसत आहेत. आता बिग बॉस हिंदीच्या येत्या काळात कोणाचा विश्वास किती खरा ठरतोय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Discussion about this post