हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स हिंदीच्या बिग बॉस या लोकप्रिय शोमध्ये अनेक सेलिब्रिटी येतात. काही प्रेमात पडतात. घराबाहेर पडून हे प्रेम टिकवतात. तर काही केवळ शोपुरता मर्यादित राहतात. तर बिग बॉसच्या सीजन १५ मध्ये गाजलेलं जोडपं करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे दोघे त्यांच्या रिलेशनशिपमूळे फार चर्चेत आले आहेत. करण आणि तेजस्वीचे सुत बिग बॉसच्या घरात जुळले आणि आता ते लग्नाचा विचहर करत आहेत. लग्न केलं कि आयुष्य बदलतं असं सगळे म्हणतात आणि म्हणूनच तेजस्वीने हा निर्णय घेण्याआधी एक पोस्ट शेअर केली आहे.
तेजस्वी प्रकाश हि तिच्या बिनधास्त आणि बोलक्या स्वभावामुळे कायम लाइमलाइटमध्ये असते. शिवाय तेजस्वी बिग बॉस १५ ची विजेती देखील आहे. त्यामुळे तेजस्वीच्या नावाची चर्चा तर होतच असते. या शो दरम्यान ती आणि करण कुंद्रा जवळ आले, प्रेमात पडले. घराबाहेरही त्यांची केमिस्ट्री टिकली. त्यामुळे आता यांनी लग्न करावे असे चाहते म्हणाले. दोघेही नेहमी एकमेकांसोबत स्पाॅट होत असतात. इतकेच नाही तर तेजस्वीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते दोघे गोव्यालासुद्धा एकत्रच पोहचले होते. त्यामुळे आता लग्न कराच असे वारंवार बोलले जात आहे. म्हणूनच तेजाने ही खास पोस्ट शेअर करणे योग्य समजले.
मध्यंतरी बातम्या येत होत्या की, करण आणि तेजस्वी लवकरच लग्न करणार आहेत. तर तेजस्वी काही दिवसांपूर्वी तिची आई आणि करणच्या आईसोबत शाॅपिंग करण्यासाठी गेली होती. यामुळे चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे भलतेच वेध लागलेले. अलीकडेच एका ठिकाणी तेजस्वी स्पॉट होताच तिला पुन्हा एकदा करणसोबत लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला गेला. त्यामुळे आता बोलायला हवं, असं पक्क करून तेजस्वीने उत्तर देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडीओ तिने करणलादेखील टॅग केलाय.
‘सॉरी’ पेक्षा ‘शुअर’ हे नेहमीच चांगले असते. हे विशेषतः सर्व मुलींसाठी आहे. काही गोष्टींसाठी वेळ घ्या.. असे म्हणत तेजस्वीने शेअर केलेल्या व्हिडीओवर टॅक्स्टमध्ये लिहिले आहे की, शादी कब होगी? तेजस्वीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. तेजस्वीने या व्हिडीओतून सरळ सरळ म्हटलंय कि, ‘जोपर्यंत तुम्ही शुअर होत नाहीत, तोपर्यंत कधीच कुणाशीच लग्न करू नका. तेजाचा हा अंदाजही तिच्या चाहत्यांना भारी आवडला आहे आणि म्हणूनच हा व्हिडीओ ट्रेंड होतो आहे.
Discussion about this post