हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्ही या हिंदी वाहिनीवर नुकतेच बिग बॉस या शोचे १६ वे पर्व मोठ्या दिमाखात सुरु झाले. शनिवार रविवार या कार्यक्रमाचा प्रीमिअर पार पडला आणि सोमवारपासून खऱ्या खेळाला सुरुवात झाली. यावेळी सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये मिस इंडिया रनअरप मान्या सिंगदेखील सामील आहे. पण प्रीमिअरच्या दिवशी आपण किती गरीब आहोत आणि मिस इंडिया असूनही आपल्याला काम मिळाले नाही याबाबत ती व्यक्त झाली. यामुळे सोशल मीडियावर मान्या दया जमा करण्याचा प्रयत्न करतेय म्हणत ट्रोल केली जाते आहे.
मिस इंडिया २०२०ची रनरअप मान्या सिंगने बिग बॉस १६ मध्ये एंट्री केली आणि बाहेर सोशल मीडिया जगतात तिच्यावर टीकांचा भडीमार होताना दिसू लागला आहे. या शोच्या ग्रँड प्रीमियरमध्ये मान्या म्हणाली होती की, शोमध्ये खास ओळख निर्माण करण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी म्हणून ती आली आहे. यामुळे तिला भरपूर पैसे मिळतील आणि तिला कामाची तसेच पैशाची खूप गरज आहे. पण आतापर्यंत मान्या या शोमध्ये फार काही करू शकलेली नाही असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आपल्या गरिबीचा देखावा मांडून दया जमा करणारी मिस इंडिया’ म्हणत तिला ट्रोल केले जात आहे.
सध्या सोशल मीडियावर मान्या सिंगचा बिग बॉस हाऊसमधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मान्या सुंबुल तौकीरला सांगत आहे की, तिच्या घरात टीव्ही नसल्यामुळे वडील हा शो पाहू शकत नाही. मान्याच्या या म्हणण्यावर सुंबुल म्हणते की, ते फोनमध्ये पाहू शकतात. यावर मान्या म्हणाली, ते गावात राहतात. त्यामुळे फोनवरही पाहू शकत नाही. दरम्यान शो प्रिमिअरवेळी मान्याने सांगितले होते की, वडील मुंबईत ऑटो चालवतात. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना ती नक्की काय बोलतेय हे कळायचंच बंद झालंय. शिवाय मंगळवारच्या एपिसोडमध्ये मान्या किचन ड्युटीवर टीनासोबत भांडताना दिसली. जी मान्या शोच्या पहिल्या दिवशी दिसली नाही, फार गरीब आहे ती भांडायला उठते हे काही लोकांना पटले नाही. यावरून ती खोट बोलतेय आणि गरिबीचं ढोंग घेते आहे असे नेटकऱ्यांना वाटत आहे.
Discussion about this post