हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या कित्येक काळापासून परंपरागत विजयादशमीच्या मुहूर्तावर रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. यामागे एकच भावना आहे कि, लोकांच्या मनात काम, क्रोध, द्वेष, राग, मत्सर या भावना निघून जाव्या आणि आनंद नांदो. या दिवसाचे औचित्य साधून दिल्लीत रामलीलेचे आयोजन केले जाते. अतिशय भव्य स्वरूपात येथे दसरा साजरा केला जातो. दरवर्षी दिल्लीत अनेक ठिकाणी भव्य रामलीला होते आणि यासाठी मोठमोठे कलाकार आणि नेतेमंडळी उपस्थित राहतात. पण यंदा कधीही न घडलेली गोष्ट घडणार आहे. ती म्हणजे, यंदा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणाऱ्या रावण दहनासाठी प्रभास मुख्य आकर्षण ठरणार आहे.
आज दिल्लीतील लव कुश रामलीला अत्यंत खास ठरणार आहे. कारण या कार्यक्रमात रावणाचं दहन करण्यासाठी दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास येणार आहे. रावणाचे दहन त्याच्या हस्ते केलं जाणार आहे. अशी माहिती लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी दिली आहे. सोबतच ते म्हणाले कि, ‘या कार्यक्रमात भारताच्या प्रथम नागरीक राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांना आमंत्रित केलेले आहे. त्या उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदेखील या सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता आहे. येथे येणारे सर्व दिग्गज पाहुणे मिळून रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथाच्या पुतळ्यांचे दहन करतील. रामलीलेत असे एकंदरीत ९ पुतळे लावले जाणार आहेत.’
दरम्यान माध्यमांनी अभिनेता प्रभासला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावण्यामागे नेमके काय खास कारण आहे..? असे विचारले असता त्यांनी उत्तर दिले कि, प्रभासच्या ‘आदिपुरुष’ सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमात तो राघव म्हणजे भगवान रामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. जानकीच्या भूमिकेत कृति सनन आणि लंकेशची व्यक्तिरेखा सैफ अली खान साकारत आहे. या चित्रपटाचा टीझर अयोध्येतच रिलीज केला गेला होता आणि म्हणून प्रमुख अतिथि म्हणून प्रभासला बोलावलं आहे. मात्र मुख्य बाब अशी कि, सिनेइंडस्ट्रीत पहिल्यांदाच असं घडत आहे. आतापर्यंत या सोहळ्यासाठी ५ लाखांहून अधिक पास वाटले गेले आहेत आणि आणखी २ लाख छापण्यास दिल्याचं समजत आहे.
Discussion about this post