हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील सतत चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींनमध्ये मौनी रॉय हे नाव रोजच झालं आहे. लक्षवेधी सौंदर्य, दिलखेचक अदा, मोहक हास्य आणि उत्कृष्ट अभिनयाच्या माध्यमातून मौनी नेहमीच सोशल मीडिया आणि माध्यामातून चर्चेत राहताना दिसते. ती स्वतः सोशल मीडियावर इतकी सक्रिय असते कि चाहत्यांच्या संपर्कात येण्याची एकही संधी ती सोडत नाही. आताही तिने सोशल मीडियावर शेअर केलेले साडीतील फोटोशूट अत्यंत आकर्षक आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर मौनीच्या सौंदर्याची जादू चालली आहे.
अभिनेत्री मौनी रॉय गेल्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे ती नेहमीच विविध पेहरावातील विविध लूक आपल्या चाहत्यांसह शेअर करताना दिसते. मौनी रॉय इंडस्ट्रीत एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते आणि तिच्या पेहरावातून तिचा हा अंदाज नेहमीच स्पष्ट दिसून येतो. सोशल मीडियावर मौनाचे भरपूर चाहते आहेत. त्यामुळे मौनीच हे पांढऱ्या साडीतील फोटोशूट चांगलाच व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे या साडीमध्ये मौनी एखाद्या परीपेक्षा कमी भासत नाहीये.
या फोटोंमध्ये अभिनेत्री मौनी रॉयने पूर्ण पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे. या साडीवर काही फ्लोरल डॉट्स आहेत. जे मौनाचे सौंदर्य आणखीच खुलवीत आहेत. मोकळे केस आणि भांगात कुंकू तसेच गळ्यात आकर्षक मोत्याचा चोकर नेकलेस त्यात मौनीच सुंदर हास्य. बस्स. इथेच कितीतरी जणांनी हृदय हरलं असेल. या फोटोशूट अनेक नेटकरी, चाहते तसेच मनोरंजन विश्वातील सेलेब्सने कमेंट केली आहे. अनेकांनी मौनीच्या या लूकची तुलना एन्जल अर्थात परिसोबत केली आहे.
Discussion about this post