हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा त्या प्रवासात अनेक स्पॉट पाहत पाहत असतो. निसर्गाच्या लहान सहन गोष्टी आपण किती सहज मोबाईलच्या कॅमेरात टिपत असतो. पण या आठवणीत खऱ्या खुऱ्या साठतात त्या मनात. जे भावलं ते विसरता येत नाही. असाच एखादा स्पॉट असतो जिथे थांबल्याशिवाय, क्षणभर रमल्याशिवाय जीवाला बरं वाटत नाही. प्रवासातील तो क्षण अतिशय विलक्षण असतो. अशाच विलक्षण क्षणात अभिनेत्री हेमांगी कवीदेखील आपलं भान हरपून निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात टिपते आहे. गावी निघालेल्या हेमांगीसाठी साताऱ्याजवळील ‘वीर धरण’ हा अगदी नेहमीचा थांबा आहे. याहीवेळी ती विसावली आणि तिने याचा एक व्हिडीओ आपल्या चाहत्यांसह शेअर केला आहे.
अभिनेत्री हेमांगी कवीने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘वीर धरण! साताऱ्याच्या शिरवळ गावाजवळचं नीरा नदीवरलं ब्रिटिशकालीन धरण! Videoत दिसतंय त्याला वीर धरण backwaters म्हणतात! खुपच सुंदर आहे आणि शांत असलं तरी अफाट आहे. ह्या मार्गे गावाला जाताना इथं थोडा वेळ थांबल्याशिवाय पुढं जाताच येत नाही. प्रत्येक वेळी खुप वेगळं वाटतं आणि खुप काही देऊन जातं. काय ते प्रत्येकाने आपआपलं अनुभवायचं! ते म्हणतात ना निर्सग एखाद्या therapy सारखा असतो इथं आल्यावर ते १०० % जाणवतं! हा काय picnic spot नाही, कधी होऊ ही नये हीच एक प्रार्थना. नाहीतर आहेतच पाण्याच्या कडेला chips ची पाकीटं, cold drinks च्या plastic च्या बाटल्यांचा थर आणि बरंच काही. अश्या गोष्टींना इथं बंदीच असायला हवी. इथं एकट्याने यावं, २-३ तास बसावं, निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीशी, तत्वाशी संभाषण करावं, त्याला आपलंसं करावं, आपल्या आत भरून घ्यावं, शांत व्हावं आणि निघून जावं! बस!’
हेमांगीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होताना दिसते आहे. याशिवाय हेमांगीच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘डोळे तृप्त करणारे दृश्य आहे.’ आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘हो आम्ही तिथून जातो आणि तिकडे आवर्जून थांबतो.’. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘सुंदर माझा सातारा.’
Discussion about this post