Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘चंद्रा’ साकारणार ऐतिहासिक भूमिका; नाकात नथ, भाळी कुंकू आणि नऊवार साडीतील लूक व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 8, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Amruta Khanvilkar
0
SHARES
174
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची चंद्रा म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर. अम्मू सध्या झलक दिखला जा या शोमध्ये चांगली जम बसविताना दिसते आहे. विविध पेहरावातील विविध डान्स ती करताना दिसते आहे आणि सोबतच प्रेक्षकांसह, परीक्षकांच्याही मनावर ती राज्य करतेय.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

पण सोशल मिडीयावर मात्र नाकात नथ, कपाळावर कुंकू, नऊवार साडीतील अमृताचा एक लूक प्रचंड व्हायरल होतो आहे. तर हा लुक अशा स्त्रीचा आहे जी शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. या इतिहासाची साक्षीदार आणि तो घडविताना जिने मोलाचा वाटा उचलला तीच हि स्त्री म्हणजेच नरवीर बाजीप्रभू यांची पत्नी सोनाबाई. ‘हर हर महादेव’ या आगामी चित्रपटात अमृता या आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. ज्याचा फर्स्ट लूक तिने शेअर केलाय.

View this post on Instagram

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

हा फर्स्ट लूक शेअर करताना झी स्टुडिओने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘योद्ध्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत घराचा डोलारा सांभाळणारी स्त्रीदेखील योद्धाच असते. गनिमांना कंठस्नान घालणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नी सोनाबाई देशपांडे यांची भूमिका साकारत आहे अभिनेत्री अमृता खानविलकर. लढण्यासाठी लाखो हत्तींचं बळ देणाऱ्या शिवमंत्राचा आवाज संपूर्ण हिंदुस्थानात घुमणार. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरपासून ‘हर हर महादेव’ मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून आपल्या भेटीला येणार..’.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

शूर नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचं आयुष्य स्वराज्याला समर्पित होतं. पण हे जगणं इतकं सोप्प कधीच नव्हतं. यासाठी त्यांना आयुष्यभर साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सोनाबाई देशपांडे यांचाही सुवर्ण इतिहास घडविण्यात नक्कीच महत्वपूर्ण मोलाचा वाटा आहे. याच सोनाबाईंची भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारते आहे. सोनाबाईंच्या निमित्ताने अमृता पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे हि भूमिका तिच्यासाठीदेखील अत्यंत जवळची आणि विशेष आहे.

Tags: Amruta KhanvilkarHar Har MahadevNew PosterNew Upcoming Movieviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group