Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आज BIGG BOSS मराठीची चावडी भरणार; मांजरेकर सगळ्यांना जाब विचारणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 8, 2022
in Trending, Hot News, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bigg Boss Marathi Chawadi
0
SHARES
138
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षक ज्या शोची आतुरतेने वाट पाहत होते तो शो म्हणजे बिग बॉस मराठी सीजन ४ गेल्या रविवारी सुरु झाला. यंदाही बिग बॉसच्या १०० दिवसाच्या या खेळात एकूण १६ स्पर्धक सहभागी झाले. या आठवडाभरात घरातील या सदस्यांनी साम, दाम, दंड, भेद सगळे नियम एकदाच वापरले आणि बिग बॉसच्या घरात दाणादाण उडवली. काही कन्फ्युज आहेत तर कुणाचा फ्यूज एकदम डार्क आहे. कुणी स्लो आहे तर कुणी एकदम फास्ट आहे. या आठवड्यात खूप झाला गदारोळ म्हणूनच मांजरेकर घेणार शाळा. आज भरणार बिग बॉसची चौथ्या सिजनमधली पहिली चावडी आणि लागणार एकेकाचा क्लास.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

पहिल्या दिवसापासूनच घरातील स्पर्धकांमध्ये तु तू मै मै चालू झाली होती. ज्याची सुरुवात अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांच्यातील वादाने झाली. एकमेकांचा धूर काढायचा असं पक्क करून यांनी घराची वाट लावली. आता पहिला आठवडा संपतोय. पण घरातले वाद संपणार थोडीच आहेत. रोज नवीन वाद. रोज नवीन धमाका. आठवडा होता होताच घरात दोन गट पडलेसुध्दा. म्हणजेच बिग बॉस मराठीच्या घराचे दोन भाग झाले. त्यामुळे आता चावडीवर यायलाच लागतंय.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉस सुरु झाल्यापासून काही टास्क दिले गेले. या स्पर्धकांनी एकही टास्क धड केला नाहीच. पण भांडण एकदम सलोख्याने केली. गेल्या सहा दिवसांपासून या घरातील सदस्यांना जे काही टास्क दिले ते कुणी कुणी बरेसुद्धा केले. पण त्यातही खोडा घातला नाही तर बिग बॉसच्या खेळात मजा काय ना..? पहिल्या दोन दिवसातच अपात्र सदस्यांना सांगकाम्या बनवलं आणि वादाचे फटाके फुटले. त्यामुले आता बिग बॉसच्या चौथ्या सिजनची पहिली चावडी चांगलीच रंगणार आहे. या शोच्या पहिल्या चावडीवर स्पर्धकांना कोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार..? कुणाला काय शिक्षा मिळणार..? कोणाला खडे बोल ऐकावे लागणार..? यासाठी शनिवारी आणि रविवारी बिग बॉस मराठी सीजन ४ ची चावडी जरूर पहा.

Tags: Bigg Boss Marathi 4Bigg Boss Marathi Chavadicolors marathiMahesh ManjrekarPromo VideoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group