हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर आदिपुरुष हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. फक्त वाईट बाब अशी कि हा चित्रपट कौतुकासाठी नव्हे तर चुकांसाठी चर्चेत आला आहे. चित्रपटाचे VFX, पात्रांची वेशभूषा यावरून सोशल मिडीआयवरील ट्रोलिंग काही केल्या थांबेनाच. यातच आता दिल्ली कोर्टात चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याची मग्न करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवून चित्रपटावर बंदी आणा अशी मागणी केली जात आहे.
#Boycott_Adipurush#Boycott_Adipurush
Playing with the religious faith and sentiments of Hindus for how long?▪️The feet of Lord Rama are not footpads but leather slippers
▪️ There is no tilak on Ravana's forehead his hair is short dreadful not a thread, like Khilji pic.twitter.com/JWiT0scCYY
— Lakshmi kumar (@Lakshmi50426035) October 8, 2022
ओम राऊत यांचा आदिपुरुष हा सिनेमा रामायणावर आधारित आहे. यामध्ये राम, सीता, लक्ष्मण, रावण, हनुमान असे प्रत्येक पात्र दाखविण्यात आले आहे. मात्र यातील आधुनिकता मात्र कुणालाच पटलेली नाही. दिल्लीत याचिका दाखल करताना असे आरोप लावण्यात आले आहेत कि, भगवान राम आणि हनुमान यांच्या अंगावर चामड्याचे बेल्ट दिसत आहेत हे खूप चुकीचं आहे आणि त्याचं चित्रणही खूप चुकीच्या पद्धतीने केलं आहे. तसंच सिनेमातील रावणाचा लूक पूर्ण चूक आहे. रामायणाचं इस्लामीकरण केल्याची झलक सिनेमात पहायला मिळतेय.
Totally Boycott.. 😠#BanAdipurush#BoycottAdipurush pic.twitter.com/FwZN098yTH
— Krishan Rajput 🇮🇳 (@Krishthisside) October 4, 2022
इतकेच नव्हे तर या सिनेमातील मिश्या नसलेल्या दाढीवाल्या हनुमानाला पाहून लोकांनी असा हनुमान कुठे पाहिलात.? अशी विचारणा दिग्दर्शक आणि निर्मात्यांना केली आहे. शिवाय त्याच्या अंगावरही चामड्याचा बेल्ट दिसल्याने लोकांनी आपली नाराजी व्यक्त करताना मेकर्सची खरडपट्टी काढली आहे.
या चित्रपटात हिंदू देवदेवतांना चुकीच्या पद्धतीने दाखवत प्रभु रामचंद्रांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रभासला मिश्या दाखवल्या आहेत हे लोकांना रुचलेलं नाही. म्हणूनच सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका काही संघटनांनी घेतली आहे. अनेक राजकीय पक्ष आणि दांभिक मतांच्या संघटनांनी चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. या सिनेमात धार्मिक पात्रांचे चुकीचे चित्रण केले आहे. ते काढून न टाकल्यास कायदेशीर कारवाई करण्याचेही बोलले जात आहे.
Discussion about this post