Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मनी हाईस्ट’ संपली पण ‘बर्लिन’ पुन्हा येतोय; Netflix’ने केली नव्या सीरिजची घोषणा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 11, 2022
in Trending, बातम्या, वेबसिरीज, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
333
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नेटफ्लिक्सवरील जगप्रसिद्ध झालेली लोकप्रिय वेब सिरीज ‘मनी हाईस्ट’ने प्रेक्षकांना चांगलाच वेड लावलं होत. या वेब सीरिजच्या कथानकाने प्रेक्षकांचे मन असे काही जिंकले होते कि केव्हा एकदा नवा सीजन येतो अशी सगळ्यांनाच उत्सुकता असायची. या वेब सीरिजचे प्रेक्षकांशी एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. विविध ट्विस्टने भरलेल्या या वेबसीरिजचे ५ भाग प्रदर्शित झाले आहेत आणि या ५ व्या भागानतंर ही वेबसीरिज संपली. त्यानंतर चाहते नाराज झाले. पण आता नाराज चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या सिरीजमधील बर्लिन पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतो आहे.

https://www.instagram.com/reel/CjfY3NfgFnn/?utm_source=ig_web_copy_link

जागतिक फॅन इव्हेंटमध्ये, नेटफ्लिक्सने एक मोठी घोषणा केली आहे. ‘बर्लिन’ येत्या २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी घोषणा करीत नेटफ्लिक्सने चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. यानंतर नेटफ्लिक्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ‘बर्लिन’वर एक स्वतंत्र स्पिन ऑफ सीरिज घेऊन येत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. अद्याप या आगामी वेब सीरिजची रिलीज होण्याची तारीख आणि इतर माहिती देण्यात आलेली नाही. मात्र बर्लिन पुन्हा भेटीला येतॊय या बातमीने चाहते खुश आहेत.

‘मनी हाईस्ट’ या वेबसीरिजमध्ये बर्लिन हि भूमिका अभिनेता पेड्रो अलोन्सो याने साकारली आहे. प्रोफेसरनंतर बर्लिन हा संघातील दुसरा अत्यंत महत्वाचा सदस्य मानला जात होता. बर्लिन अतिशय शूर, धाडसी आणि मजेशीर असे पात्र दाखविण्यात आले होते. यासह काही बाबतीत मात्र तो अधिकतम रहस्यमय देखील होता. स्त्रियांमध्ये जास्त इंटरेस्ट असणाऱ्या बर्लिनने Heist चे संपूर्ण प्लॅन बनवण्यात मोठा वाटा घेतला होता. यामुळे तो सगळ्यांना लाडका ठरला होता. यांनतर आता बर्लिन पुन्हा येतोय हि बाब प्रेक्षकांसाठी अत्यंत आनंददायी ठरली आहे.

Tags: Instagram PostMoney HeistNetflixUpcoming Web SeriesViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group