हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अखेर मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या लाडक्या मायदेशी परतली आहे. आपण सारेच जाणतो कि, एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी संपूर्ण चित्रपटाच्या टीमसोबत प्राजु लंडनला गेली होती. परदेशात ती खूप फिरली, मजा केली पण दिवसाखेरीज आपल्या देशाची आपल्या माणसांची आठवण तिला सतत सतावत होता. शिवाय परदेशात मनाजोगतं चवीचं असं काहीच न मिळाल्याने कधी एकदा परत जाते असं प्राजक्ताला झालं होत. यानंतर आता मायदेशी परतल्याचा एक वेगळाच आनंद तिच्या चेहऱ्यावर नुसता ओसंडून वाहतोय. मायदेशी आल्यानंतर सगळ्यात आधी तिने भारतीय खाद्य पदार्थांवर ताव मारला आहे. याची प्रचिती तुम्हाला तिने शेअर केलेल्या या पोस्टमधून येईल.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर हि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने मराठमोळ्या पद्धतीचे भारतीय चमचमीत पदार्थ खातानाचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने एक भन्नाट कॅप्शनसुद्धा लिहिले आहे. यामध्ये प्राजक्ताने लिहिले आहे कि, ‘परतल्यावर भूकेचे (तिखट, चमचमीत जेवणाचे) डोहाळे लागलेत…. मी सध्या हे खातेय…. (तरी भूकेच्या भरात सगळीकडे फोटोज् नाही काढले…) Diet गेलं तेल लावत…’ यासोबत तिने स्माईली इमेज शेअर केली आहे. तिची हि पोस्ट सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होते आहे.
प्राजक्ताच्या या पोस्टला तिचे चाहते भरभरून पसंती देत आहेत. सोबतच यावर प्रतिक्रिया देत एकापेक्षा एक कमेंटचा पाऊस पडतोय. एका नेटकऱ्याने या फोटोवर कमेंट करताना लिहिले आहे कि, ‘किती पन खाल्लं तरी आमची प्राजू पतली’. तर अन्य एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘परिपूर्ण आहेस तू सगळ्याच बाजूने.. भजी आणि अळूवडी बघून तोंडाला पाणी सुटलं’. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘तुम्ही सांगितल म्हणून आम्ही हेल्दी फूड आणि योगा सुरू केला आणि तुम्हीच आता चमचमीत पदार्थ खाताय. आम्हाला ही आता एखादा cheat day meal घ्यावा लागेल.’ तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘सकाळी सकाळी काय वडाप चाललय’. तसेच आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘ईतक खाल्यावर एक महिना dietकरावला लागेल , जिम करावी लागेल मॅम.’
Discussion about this post