हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुलतानी अंधार पसरलेला असताना माता जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या झणाणत्या रणझुंजार कर्तृत्वाचे भाष्य करणारा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट आपल्या भेटीस येण्यास सज्ज आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटाबाबत वेगळीच उत्सुकता आहे. या चित्रपटाला अत्यंत तगडी स्टारकास्ट लाभली आहे. झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या आणि अभिजित देशपांडे यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या या चित्रपटातील निष्ठावान आबाजी विश्वनाथ यांच्या भूमिकेवरून पडदा उठला आहे. या भूमिकेत मराठी अभिनेता हार्दिक जोशी आपल्याला दिसणार आहे. तसे पोस्टर देखील प्रदर्शित झाले आहे.
अभिनेता नितीश चव्हाणने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर आपल्या आगामी चित्रपटातील भूमिकेचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानणाऱ्या ,त्यांच्या अनेक निष्ठावान , धाडसी आणि विश्वासू मावळ्यांपैकी एक म्हणजे धनाजी म्हसकर. भूमिका साकारत आहेत अभिनेते नितिश चव्हाण. लढण्यासाठी लाखो हत्तींचं बळ देणाऱ्या शिवमंत्राचा आवाज संपूर्ण हिंदुस्थानात घुमणार…येत्या दिवाळीत, २५ ऑक्टोबरपासून ‘हर हर महादेव’ मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून आपल्या भेटीला येणार.’
भारताचा इतिहास प्रत्येकाला कळावा, म्हणून एक नाही, दोन नाही तर तब्बल पाच विविध भाषांतून ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अभिजीत देशपांडे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स’ने केली आहे. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला ‘हर हर महादेव’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत अभिनेता सुबोध भावे तर त्यांच्या पत्नी महाराणी सईबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री सायली संजीव दिसणार आहे. याशिवाय बाजीप्रभूंच्या भूमिकेत शरद केळकर आणि त्यांच्या पत्नी सोनाबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता खानविलकर दिसणार आहे. तर निष्ठावान आबाजी विश्वनाथ यांच्या भूमिकेत अभिनेता हार्दिक जोशी दिसणार आहे. यानंतर आता नितीश चव्हाणच्या भूमिकेवरून पडदा उघड झाल्यामुळे चित्रपटाबाबत आणखीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
Discussion about this post