हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत लोकप्रिय फॅमिली ड्रामा ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करत आहे. मात्र गेल्या काही काळापासून मालिकेचा टीआरपी बऱ्यापैकी खाली आला आहे. याचे कारण ठरले ते दयाबेनची एक्झिट.
अभिनेत्री दिशा वकानीने अतिशय चपखलपणे गेली कित्येक वर्ष दयाबेन हे पात्र जगवले आणि प्रेक्षकांच्या मनात रुजवले. यामुळे दिशा यांनी मालिका सोडताच याचा परिणाम टीआरपीवर झाला. दिशा यांनी मालिका सोडण्यामागे विविध कारणे वेगवेगळ्या माध्यमांतून समोर आली. मात्र आज खरे कारण समोर आल्यानंतर प्रेक्षकांनाही धक्काच बसला आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत दयाबेन ही व्यक्तिरेखा साकारताना अभिनेत्री दिशा वकानी यांना इतरांपेक्षा अतिशय वेगळा आणि लक्षवेधी आवाज काढायला लागत असे. हे पात्र वाढविण्यासाठी दिशा अतिशय वेगळ्याच आवाजात बोलायच्या. तो विशिष्ट आवाज या व्यक्तिरेखे मोठं बनवीत होता. तर दुसरीकडे दिशा यांच्या प्रकृतीसोबत खेळत होता.
माहितीनुसार दिशा वकानी गळ्याच्या कॅन्सरशी सामना करत आहेत. काही रिपोर्ट्सनुसार दावा केला जातोय की, त्यांना गळ्याचा कॅन्सर झाला आहे. हा कॅन्सर त्यांना दयाबेन या व्यक्तिरेखेसाठी दिलेल्या आवाजामुळे झाला आहे. हा आवाज काढण्यासाठी त्यांना कंठावर जोर द्यावा लागत असे. यामुळे त्यांना गळ्याचा त्रास सुरु होऊन पुढे कॅन्सरने गाठले. दिशा यांना हा आजार कधी झाला हे अद्याप कळलेलं नाही.
दिशा वकानी यांनी तारक मेहता का उलटा चष्मा हि मालिका २०१९ मध्ये सोडली. याचे कारण मॅटर्निटी लीव्ह होते. पण त्यानंतर दिशा पुन्हा शोमध्ये आल्याचं नाही. मेकर्सने दिशा यांना शो मध्ये परत येण्यासाठी अनेकदा संपर्क साधला. मात्र दिशा यांनी प्रत्येक वेळा आपला नकारच कळवला. दिशा वकानी 2010 मध्ये एके ठिकाणी दयाबेनच्या स्टाइलमध्ये बोलायला गेल्या तेव्हा खूप विचित्र आवाज त्यांनी काढला.
यावेळी त्या म्हणाल्या होत्या कि, ‘प्रत्येकवेळी तसा आवाज काढणं, तसं बोलणं कठीण होतं. पण देवाची कृपा आहे माझ्या मूळ आवाजाला यामुळे अद्याप काही नुकसान झालेलं नाही.’ दिशा यांनी मालिका सोडल्यानंतर खूप अभिनेत्रींची नाव दयाबेन भूमिकेसाठी समोर आली. पण दयाबेन निश्चित झालीच नाही. उलट इतर काही पात्र साकारणाऱ्या कलाकारांनी देखील मालिकेला रामराम ठोकला.
Discussion about this post