हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीतील नामांकित दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता दिगपाल लांजेकर हे इतिहासातील सुवर्ण पाने हळू हळू उलघडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्यगाथांचा हा जागर अविरत सुरूच आहे. आताच्या पिढीला आणि पुढच्या पिढीला हा सुवर्ण इतिहास माहित व्हावा म्हणून हा सारा घाट त्यांनी घातला आहे. आतापर्यंत शिवकालीन अष्टकातील चार पुष्प प्रदर्शित झाल्यांनतर आता दिग्पाल लांजेकर यांनी पाचव्या पुष्पाची घोषणा केली आहे.
दिगपाल लांजेकर दिग्दर्शित ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या शिवराज अष्टकातील चार यशस्वी चित्रपटांनंतर आता ‘सुभेदार’ हा नवा ऐतिहासिक चित्रपट येऊ घातला आहे. आतापर्यंत शिवकालीन अष्टकातील चारही चित्रपटांची प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या चारही कलाकृती चांगल्याच गाजल्या. यांनतर आता शिवराज अष्टकातील पाचव्या चित्रपटाची घोषणा केल्यामूळे प्रेक्षकांमध्ये अत्यंत उत्साह आणि उत्सुकता दोन्ही पाहायला मिळतो आहे. आता या आगामी चित्रपटात काय पहायला मिळणार? याबाबत सर्वांनाच कुतूहल आहे.
‘सुभेदार’ या चित्रपटाची घोषणा करताना ‘काळावर नाव कोरणाऱ्या महावीराची महागाथा…’ असे समर्पक वाक्य सोबत जोडले आहे. तूर्तास ‘सुभेदार’ या शीर्षकावरून हा चित्रपट सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित असणार इतके समजते आहे. यामध्ये तान्हाजी मालुसरे यांचे शौर्य आणि त्यांनी राखलेल्या सिंहगडाची थरारक कथा पहायला मिळणार आहे. आधी लगीन कोंढाण्याचं म्हणत ज्या सिंहाने गड राखला त्याच्या अंगावर काटा आणणाऱ्या पराक्रमाची हि गाथा आहे. ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट प्रस्तुत ‘सुभेदार’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. तर प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायण वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे, विनोद निशिद जावळकर, शिवभक्त अनिकेत निशिद जावळकर, श्रुती दौंड हे निर्माते आहेत. येत्या वर्षात जून २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Discussion about this post