हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘ब्लॅक फ्रायडे’ सारख्या चित्रपटातून ज्यांनी आपल्या अभिनयाची छाप सिने सृष्टीवर सोडली त्या जितेंद्र शास्त्री यांची अचानक एक्झिट अत्यंत वेदनादायी आहे. ‘इंडियाज मोस्ट वॉंटेड’ या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड नावाजली होती. अभिनेते जितेंद्र शास्त्री यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी मनोरंजन विश्वासह जगाचा निरोप घेतला आहे. हिंदी थिएटर ग्रुपमध्ये ‘जीतू भाई’ नावाने ओळखले जाणारे जितेंद्र शास्त्री हे अभिनेता म्हणून उत्तम होतेच. शिवाय माणूस म्हणूनही कायम आठवणीत राहण्यासारखे व्यक्तीमत्व होते.
CINTAA expresses its condolences on the demise of Jitendra Shastri pic.twitter.com/v9EwNBBR9A
— CINTAA_Official (@CintaaOfficial) October 15, 2022
अभिनेते जितेंद्र शास्त्री यांच्या निधनाचे वृत्त अधिकृतपणे जाहीर झाले आहे. मात्र त्यांच्या निधनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सिने आणि टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशनने (CINTAA) जितेंद्र शास्त्री यांच्या निधनावर दुःख व्यक्त करीत अधिकृत ट्वीटर हँडलवर श्रद्धांजलीपर एक मेसेज शेअर केला आहे. जितेंद्र यांचा फोटो शेअर करत यामध्ये लिहिलं आहे की, ‘तुमची खूप आठवण येईल जितेंद्र शास्त्री’
याशिवाय जितेंद्र यांचे सहकलाकार अभिनेते संजय मिश्रा यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटर हँडलवर जितेंद्र यांच्यासोबतचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते दोघे बर्फानं वेढलेल्या पर्वतरांगात फिरत पर्यटनाचा आनंद घेत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले आहे कि, ‘जीतू भाई तू असतास तर बोलला असतास ‘मिश्रा कधीकधी काय होतं ना मोबाईलमध्ये नाव राहतं पण माणूस नेटवर्कमधनं आऊट होतो’. तुम्ही आता या जगात राहिला नाहीत, पण माझ्या मनात आणि विचारांच्या नेटवर्कमध्ये कायम रहाल.’
जीतू भाई आप होते तो आप कुछ ऐसा बोलते, " मिश्रा sometimes क्या होता है ना कि, mobile में नाम रह जाता है, और इंसान network से out हो जाता है ", you are out of the world, but will always remain in network of my mind and heart 😔🙏 Om Shanti 🙏 pic.twitter.com/XWP78ULCiO
— Sanjay Mishra (@imsanjaimishra) October 15, 2022
जितेंद्र शास्त्री यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून अभिनयाचं शिक्षण संपादन केलं होतं. नाट्यक्षेत्रात त्यांचे एक वेगळे वलय होते. जितेंद्र यांनी ‘कैद ए हयात’ आणि ‘सुंदरी’सारख्या दर्जेदार नाटकांमधून काम केले आहे. तर ‘ब्लॅक फ्राय डे’, ‘दौड’, ‘लज्जा’, ‘चरस’ सारख्या सिनेमांतूनही अव्वल भूमिका वठविल्या. त्यांची २०१९ मध्ये आलेल्या अर्जुन कपूरच्या ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ सिनेमातील भूमिका मात्र सगळ्यांच्या मनावर छाप सोडून गेली. यामध्ये त्यांनी नेपाळमधील एका गुप्तहेराची भूमिका साकारली होती. जो भारताला एका कुख्यात दहशतवाद्याला पकडण्यासाठी मदत करत असतो.
Discussion about this post