हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर झी स्टुडिओ निर्मिती मराठमोळा ऐतिहासिक चित्रपट ‘हर हर महादेव’ प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात सुबीओढ भावे शिवरायांच्या भूमिकेत तर शरद केळकर बाजीप्रभूंच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय इतर भूमिकांची कास्टदेखील अतिशय तगडी आहे. दरम्यान या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावे याने मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ज्यामध्ये ठाकरे यांनी आगामी काळात ऐतिहासिक चित्रपट काढण्याची घोषणा केली आहे. शिवरायांवरील हा चित्रपट दोन ते तीन भागात असेल असेही त्यांनी सांगितले आहे.
हरहर महादेव चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरसाठी राज ठाकरे यांनी आवाज दिला आहे. त्यामुळे हि मुलाखत फार उत्कंठतेने पहिली गेली. या मुलाखतीला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये राज यांनी आपल्या चित्रपट विषयक वेगवेगळ्या आठवणी आणि आवडी सांगितल्या आहेत. राज ठाकरे म्हणाले कि, मी पहिल्यांदा व्हाईस ओव्हर दिला होता तो २००३ मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत घेतली होती तेव्हा. ती अचानक जबाबदारी माझ्य़ावर आली होती. व्हाईस ओव्हर देणे माझे काम नाही. मी त्याचा कधीच विचार केला नाही. मग २००४मध्ये मी शिवसेनेचे कॅम्पेन केले त्या ९ फिल्म्सचा आवाज अजित भुरे यांचा होता. मुंबईवरील बॉम्बस्फोटाच्या एका अॅड फिल्मला माझा आवाज होता. फिल्म झाल्या आंणि बाळासाहेबांना त्या आवडल्या.
पुढे म्हणाले कि, मुळात चित्रपट बनवणे हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. म्हणून मी त्याला वेगवेगळ्या अँगलनं पाहतो. गांधी हा चित्रपट मी किती वेळा पाहिला असेल मलाच माहिती नाही. यावरुन माझी पत्नी मला नेहमी टोकते. चित्रपटाची मला आवड आहे. म्हणून मी यात सहभागाचा प्रयत्न करतो. यामागे कष्ट घेणाऱ्यांपैकी व्हाईस ओव्हर हा एक भाग आहे. तो काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी मी व्हाईस ओव्हर करतो. जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा प्लाझाला गांधी चित्रपट लागला होता. कॉलेजच्या काळात पहिल्यांदाच असा मनात आला की असाच भव्य चित्रपट शिवाजी महाराजांवर यायला हवा. त्यानंतर मी वाचायला सुरुवात केली आणि लक्षात आले की, छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट होऊ शकत नाही. कारण ती खूप मोठी गोष्ट आहे. मी त्याविषयी अनेकांना विचारणाही केली होती. मात्र आता मी स्वत: महाराजांवर चित्रपट काढण्याचा विचार करतोय.
Discussion about this post