हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। समित कक्कड दिग्दर्शित ‘३६ गुण’ या चित्रपटात एकदम फ्रेश जोडी आणि फ्रेश रोमान्स पहायला मिळणार आहे. पण ऑनस्क्रीन रोमांसला मर्यादा हवी असे प्रेक्षकांचे नेहमीच म्हणणे आले आहे. यामुळे ३६ गूण या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजनंतर सोशल मीडियावर नुसता चर्चांना उधाण आला होता. सगळीकडे एकच चर्चा आहे कि ऑनस्क्रीन अशा सीन्सची आवश्यकता काय..? खरंतर या चित्रपटातून मोठ्या ब्रेकनंतर संतोष जुवेकर कमबॅक करत आहे. त्यामुळे चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. असे असताना चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप घेतला जात असल्यामुळे पुढे काय होईल..? असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. यावर चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री पूर्वा पवारने आपले स्पष्ट मत मांडले आहे.
आगामी मराठी चित्रपट ३६ गूण या चित्रपटातून पूर्वा पवार मोठ्या पडद्यावर पदार्पण करतेय. नाटक, मालिका, सिनेमा, मॉडेलिंग अशा विविध प्लॅटफॉर्मवर बिंधास्त वावरलेली पूर्वा आता मोठ्या पडद्यावर दिसण्यासाठी उत्सुक आहे. अभिनेते प्रमोद पवार यांची मुलगी असूनही तिने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप घेणाऱ्या ट्रोलर्सला तिने बेधडक उत्तर दिलं आहे. या चित्रपटातील तिचं वागणं, बोलणं, बोल्ड सीन्स आणि एकंदरीत लग्न या महत्त्वाच्या विषयावर तिने थेट मत मांडलं आहे.
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पूर्वा म्हणाली कि, ‘३६ गुण’ हा सिनेमा लग्नसंस्थेवर भाष्य करतो. पण मुळात माझा लग्न संस्थेवर विश्वासच नाही. आता लीव्ह इन रिलेशनशीपबद्दल बोलायचं असेल तर, माझी मतं आजच्या तरुणाईसारखीच आहेत. जर कधी मनात विचार आला लग्नाचा तर लव्हमॅरेज की अरेंज मॅरेज तर याबाबतीतही मी क्लिअर आहे. पण सध्या तरी लग्न नाहीच या मतावर मी ठाम आहे. राहिला प्रश्न चित्रपटातील सीन्सचा.. तर हनिमूनला गेलेलं कपल याशिवाय आणखी काय करणार…? अशाप्रकारे पूर्वाने चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप घेणाऱ्यांना स्वतःच उलटून प्रश्न विचारत अनुत्तरित केले आहे.
Discussion about this post