Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

वनीने निवडले धनी! MHJ’च्या वनिताची हॅशटॅग सुमितवाणी; सोशल मीडियावर फोटो केला शेअर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 19, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
SumitVani
0
SHARES
1.7k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील MHJ म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. या कॉमेडी मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे. यातील प्रत्येक हास्यवीर अक्षरशः वेडा आहे आणि आपल्या वेडेपणाने तो सगळ्यांना हसवीत असतो. या हास्यवीरांमध्ये सगळेच कमाल आहेत. पण वनिता खरातची जाडी काही औरच आहे. एकापेक्षा एक पात्र, उत्तम संहिता आणि ते सादर करूनपोट दुखेपर्यंत हसवणारी वनिता सगळ्यांचीच लाडकी आहे. कधी उत्तरप्रदेशची बाई, कधी सासूबाई, कधी मामी तर कधी लहान मुलगी होऊन हसवते. याच वनीच्या आयुष्यात तिच्या अहोंनी एंट्री घेतली आहे बरं का! नुकताच तिने आपल्या प्रियकरासोबतचा फोटो शेअर केलाय. जो चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

आपल्या प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांना हसवणारी वनिता आपल्या खाजगी आयुष्याबद्दल फारशी कधी बोलताना दिसलीच नाही. पण यावेळी तिने अधिकृत सोशल मीडिया हँडलवर थेट प्रियकराचा फोटो शेअर करत आपले प्रेम जाहीर केले आहे. या पोस्टमुळे पहिल्यांदाच तिच्या प्रियकराचा चेहरा समोर आला आहे. वनिताने तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या निमित्ताने तिने तोच आपला साथीदार असल्याचे सांगितले आहे. वनिताच्या बॉयफ्रेंडचे नाव सुमित लोंढे आहे. तिने पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘कुछ तूने सी है मैंने की हैं रफू….ये डोरियां …….हॅप्पी बर्थडे ‘साथी’. सोबत हॅशटॅग sumeetvani असेदेखील लिहिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sumit Londhe (@sumit_ashok_londhe)

वनिताची हि पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये काही कलाकारांच्याही कमेंट्स आहेत. जसे कि पृथ्वीक प्रताप, समीर चौगुले, नम्रता संभेराव, ओंकर राऊत यांनीही तिच्या या पोस्टवर कमेंट करत सुमीतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर सुमितनेही सर्वांचे आभार मानले आहे. माहितीनुसार, सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. सुमीतने या आधी बऱ्याचदा दोघांचे एकत्र फोटो शेअर केले आहेत. मात्र वनिता पहिल्यांदाच आपल्या नात्याबद्दल व्यक्त झाली आहे. लवकरच ते लग्नबंधनात देखील अडकतील अशी चिन्हे दिसत आहेत.

Tags: comedianInstagram PostSumit LondheVanita KharatViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group