हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीत यंग आणि फ्रेश अभिनेत्रींच्या यादीत आता हवाहवाईची लेक अर्थात अभिनेत्री जान्हवी कपूरच्या नावाचा उल्लेख हमखास केला जातो. ती नेहमीच आपल्या सौंदर्य आणि हटके अदांसाठी चर्चेत राहताना दिसते. तिची मादक अदा चाहत्यांना घायाळ करण्यासाठी पुरेशी आहे. मुख्य म्हणजे जान्हवी स्वतः सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. यामुळे ती तिचे विविध पेहरावातील विविध लूक फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर करताना दिसते. आताही तिने असाच एक नवा आणि बोल्ड ब्लॅक लूक शेअर केला आहे. जो चाहत्यांच्या पसंतीस पडतोय.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतेच एक फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोशूटमध्ये जान्हवीचा लक्षवेधी असा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक आपल्याला पहायला मिळतो आहे. जान्हवीच्या नव्या फोटोशूटचा एक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. जान्हवी कपूरचा हा अंदाज देखील तिच्या चाहत्यांना प्रचंड भावताना दिसतो आहे. जान्हवी आपल्या चाहत्यांसाठी कायमच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे चाहतेही तिच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करतात.
जान्हवीने शेअर केलेले हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. यामध्ये जान्हवीने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. सोबत मोकळे केस सोडले आहेत. तिचा हा लूक प्रचंड ग्लॅमरस असून लक्ष वेधून घेतो आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी आपली पसंती दर्शवित विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हार्ट ईमोजी शेअर करत आपली पसंती दर्शवली आहे. जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, येत्या ४ नोव्हेंबर २०२२ रोजी तिचा मिली हा हॉरर ड्रामा चित्रपट रिलीज होतो आहे. ज्याचे दिग्दर्शन मथुकुट्टी झेवियर यांनी केले आहे.
Discussion about this post