हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीवरील अत्यंत लोकपोरीय रिऍलिटी शो बिग बॉसचा १६ वा कमालीचा सीजन सुरु आहे. यंदा सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी आतापर्यंत एका स्पर्धकाला प्रेक्षकांनी घरचा रस्ता दाखवला आहे. श्रीजीता डे हिच्या एव्हिक्शनंतर घरात जो तो खेळाकडे जिंकण्याच्या दृष्टीने पाहताना दिसतो आहे. बिग बॉसचं घर आहे जिथे प्रेम, मैत्री, दुष्मनी अशी विविध भावनांची नाती तयार होत असतात. दरम्यान या घरात गौतम धर आणि शालीन भनोत यांची चांगली मैत्री असल्याचे पहायला मिळाले होते. पण गेल्या काही काळात या नात्यात दरी निर्माण झाली आहे. आतातर सूंबूलमुळे त्यांच्यात जोरदार भांडण झाल्याचे पहायला मिळाले.
कलर्स टीव्हीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये पहायला मिळतंय कि, शालीन आणि गौतम एकमेकांवर आवाज चढवून बोलत आहेत. या व्हायरल प्रोमोमध्ये आपण पाहू शकता कि, सुंबूल हि गौतम आणि इतर घरातील सदस्यांसोबत गप्पा मारत आहेत. अशावेळी सगळे तिला छेडत आहेत. कुणी टोमणे मारतंय. तर कुणी समजुतीचे चार शब्द सांगतंय. यानंतर सुंबूल तिथून निघून जाते आणि शालिनजवळ जाऊन बसते. ती शालीनला आपल्याला चिडवत असल्याचे टोमणे मारत असल्याचे सांगते. ज्यामुळे शालीन चिडतो.
यानंतर पुढे शालीन गौतम आणि टीनाला खरीखोटी सुनवायला लागतो. ज्यामुळे टिना आणि गौतमसुद्धा भडकतात आणि त्याला उलटून बोलू लागतात. यामुळे शब्दाला शब्द वाढत जातो आणि गौतम शालीन भान हरपूर्ण एकमेकांच्या अंगावर जाऊ लागतात. अशातच त्यांच्या मध्ये सुंबूल पडते आणि भांडणं थांबविण्याचा प्रयत्न करते. दरम्यान यामुळे सुंबूलनेच भांडणं लावली आणि आता तीच सोडवते आहे..? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. आता नेमकं काय झालं..? कसं झालं..? कुणामुळे झालं..? हे आजच्या भागात कळेल.
Discussion about this post