हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवर प्रसारित होणार प्रेक्षकांचा अतिशय लाडका आणि आवडता कॉमिक शो म्हणजे MHJ. अर्थातच महाराष्ट्राची हास्यजत्रा. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने, दत्तू मोरे, गौरव मोरे, वनिता खरात अशी वेडी मंडळी त्यांच्या वेडेपणात प्रेक्षकांना मिसळून घेतात आणि पोट दुखेपर्यंत हसवतात. काय सांगताय..? तुमच्याही घरात असे हास्यवीर आहेत. पण ते छोटे आहेत..? अहो मग चिंताच सोडा. कारण महाराष्ट्राची हास्यजत्रा घेऊन आली आहे छोटे हास्यवीर स्पर्धा. या स्पर्धेत मुलांना पाठवा आणि मिळवा MHJ परिवाराचा भाग होण्याची सुवर्ण संधी.
सोनी मराठीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमित फाळके यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा- छोटे हास्यवीर’ या स्पर्धेची माहिती देणारा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये परीक्षक आणि अभिनेता प्रसाद ओक, हास्यवीर समीर चौघुले, नम्रता संभेराव, शो होस्ट प्राजक्ता माळी स्पर्धेची माहिती देत आहेत. यात सांगितलं आहे कि, ‘सोनी मराठी घेऊन येत आहे महाराष्ट्राची हस्याजत्रा- छोटे हास्यवीर स्पर्धा’. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या घरातील १४ वर्षाखालील मुलांचे विनोदी परफॉर्मन्सचे व्हिडीओ सोनी लिव्ह ऍपवर जाऊन तिथे दिलेल्या सूचनांचे पालन करून अपलोड करावेत. त्यातल्या सर्वोत्तम ५ जणांना मिळणार आहे महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये येण्याची सुवर्ण संधी.
या व्हिडीओ डिटेलसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – छोटे हास्यवीर’ स्पर्धा! या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्या कुटुंबातील १४ वर्षांखालील पाल्यांचा विनोदी सादरीकरणाचे व्हिडिओ SonyLIV ॲपवर जाऊन upload करा. सर्वोत्तम 5 विजेत्यांना मिळेल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात येण्याची सुवर्णसंधी!! उद्या रात्री 9 वाजल्यापासून ऑडिशन्स स्वीकारल्या जातील. नियम आणि अटी लागू*’ म्हणजेच दिलेल्या माहितीनुसार आज रात्री ९ नंतर या स्पर्धेसाठी ऑडिशन व्हिडीओ स्विकारले जाणार आहेत. तर मग वाट पाहू नका. तुमच्याही मुलांमध्ये असेल लोकांना हसविण्याची कला तर स्पर्धेमध्ये भाग घेऊ चला..
Discussion about this post