Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘शमा.. साठी’; महाबळेश्वरमध्ये पुस्तकांच्या गावात प्रसिद्ध अभिनेत्रीच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 21, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Shama Ninawe
0
SHARES
58
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वात अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्या अंगी एक नव्हे, दोन नव्हे तर इतर अनेक गन ठासून भरले आहेत. हे कलाकार आपल्यातील कलेच्या प्रत्येक अंगाचा वापर करीत असतात. कधी मनोरंजन करण्यासाठी तर कधी आपसी सुखासाठी. कलेच्या प्रांतात गेली कित्येक वर्ष आपल्या विविधांगी गुणांनी मनोरंजन सृष्टीला वृद्धिंगत करणाऱ्या मराठी अभिनेत्री शमा निनावे यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shama Ninawe (@shamaninawe)

मिळालेल्या माहितीनुसार, मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाचा यशस्वी ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री शमा निनावे आता काव्यसंग्रहाच्या माध्यमातून एक कवयित्री म्हणून चाहत्यांच्या भेटीला आल्या आहेत. होय. नुकताच त्यांचा ‘शमा…साठी’ हा अत्यंत भावनांना भिडणारा असा मनमोहक काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीस आला आहे. भावनेच्या पटलावर मनामनात उमटलेल्या विविध स्वभावाचे तरंग या काव्यसंग्रहातून शमा यांनी यशस्वीरीत्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शमा यांच्या निवडक कवितांचे संकलन असलेले ‘शमा…साठी’ हे पुस्तक त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त प्रकाशित करण्यात आले आहे. हे सरप्राईज त्यांचे पती शशांक निनावे यांनी दिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन ‘भिलार’ या महाबळेश्वर येथील ‘पुस्तकांच्या गावात’ कार्यकारी मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आले.

View this post on Instagram

A post shared by Shama Ninawe (@shamaninawe)

विख्यात वास्तूविशारद आणि शमा यांचे पती श्री. शशांक निनावे यांनी स्व-हस्ताक्षरात लिहून या कवितांचे अप्रतिम चित्रांकन केले आहे. या कविता ‘हायकू’ या जपानी काव्य प्रकारात मोडतात. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय असा हा प्रकार आहे. तसेच या काव्यसंग्रहाची संकल्पना राजश्री निकम, शिल्पा वडके, कनीनिका निनावे यांची आहे. तर प्रकाशकाची जबाबदारी अंकित उदेशी आणि मुद्र्काची जबाबदारी माधव पोंक्षे यांनी समर्थपणे सांभाळली आहे. मुखपृष्ठाच्या आतील पोट्रेट खुशी निनावे यांनी काढले असून रचना, सुलेखन, रेखाचित्रे शशांक निनावे यांची आहेत. अशा या काव्यसंग्रहाबद्दल बोलताना शमा म्हणाल्या कि, ‘शब्दांमधून व्यक्त होण्याचं समाधान लिहित्या हातासाठी खूप मोलाचं असतं’.

Tags: Instagram PostMarathi ActressViral Photoviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group