Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘शक्तिमान’चा दिग्दर्शक हिंदू नसल्याने काहीही फरक पडत नाही, शेवटी धर्मापेक्षा टॅलेंट महत्वाचं..

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 22, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Shaktimaan
0
SHARES
104
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी पिक्चर्सने एका शॉर्ट व्हिडिओतून येत्या काळात भारतीय टेलिव्हिजन इण्डस्ट्रीतील सुपर हिरो मोठ्या पडद्यावर आणणार अशी घोषणा केली होती. हा सुपरहिरो म्हणजे नव्वदीच्या काळातील लहानग्यांचा लाडका शक्तिमान. हा चित्रपट VFX चा वापर करून आकर्षित केला जाईल अशीही घोषणा केली गेली होती. यामुळे साहजिकच सर्वांमध्ये मोठी उत्सुकता होती. मात्र या चित्रपटाबाबत एक बातमी समोर येताच टीव्ही मालिकेत शक्तिमानची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते मुकेश खन्ना यांनी संताप व्यक्त केला आहे.

BIG ANNOUNCEMENT: SONY PICTURES TO BRING THE ICONIC 'SHAKTIMAAN' TO THE BIG SCREEN…
⭐ This time, #Shaktimaan will be made for *cinemas*.
⭐ Will be a trilogy.
⭐ One of #India’s major superstars will enact the title role.
⭐ A top name will direct. pic.twitter.com/ood6KvghPM

— taran adarsh (@taran_adarsh) February 10, 2022

काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील मुख्य भूमिकेत सुपरहिरो शक्तिमान म्हणजं रणवीर सिंग दिसेल अशी चर्चा होती. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण त्याआधी सगळ्यात मोठा प्रश्न होता कि, या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार..? तर काही रिपोर्ट्सनुसार, २०२१ मध्ये आलेला मल्याळम सुपरहिरो सिनेमा ‘मिन्नल मुरली’ने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. त्यामुळे त्याला दिग्दर्शित करणाऱ्या बेसिल जोसेफ यांनी शक्तिमान चित्रपट दिग्दर्शित करावा म्हणून संपर्क केला आहे. यावर सोशल मीडियावर एक ट्वीट व्हायरल झालं. ज्यामध्ये शक्तिमान चित्रपटाचा दिग्दर्शक हिंदू नाही म्हणून मुकेश खन्ना नाराज असल्याचे म्हटले होते. याबाबत आता स्वतः मुकेश खन्ना यांनी खुलासा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

मुकेश खन्ना यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लिहिलं की, ‘हे अशा पद्धतीनं जे आरोप माझ्यावर केले गेलेयत त्यानं मला खरंच मानसिक त्रास झाला आहे. शक्तिमान सिनेमा कोण दिग्दर्शित करेल याविषयी सध्या बोलणं खूप घाईचं होईल. माझे निर्माते आणि मी याविषयी विचार करत आहोत. पण एक दिग्दर्शक हिंदू नाही यावरनं जे काही मुद्दे उठवले जात आहेत हे खूपच विचित्र आहे. एक ट्वीट केलं आहे ज्यात लिहिलं आहे की शक्तिमानचा दिग्दर्शक हिंदू नाही म्हणून मी नाराज आहे. पण मला इथे हे स्पष्ट करायला आवडेल की, मी असं काहीही बोललेलो नाही. मला माहितही नाही हे कुणी आणि कुठल्या आधारावर सर्वत्र पसरवलं आहे. यात काहीच तथ्य नाही.’

Such a thing is really absurd & is totally unwarranted. I request fans of #Shaktimaan to not pay attention to any information that doesn't come from my producers or me officially. We've not signed anyone. Shaktimaan is idea of India. It’s far bigger than anyone's petty lies! pic.twitter.com/Bz6xcQmqAQ

— Mukesh Khanna (@actmukeshkhanna) October 21, 2022

पुढे लिहिलंय की, ‘टॅलेंट म्हत्त्वाचं, ना की धर्म. शक्तिमान भारताला रिप्रेझेंट करणार आहे ना कोणत्या धर्माला. मी कलेचा, ज्ञानाचा आदर करतो. त्यामुळे कोणीही असं माझ्याविषयी चुकीचं बोलत असेल ते मुद्दामहून करत आहे. त्याला कशाचाच आधार नाही. मी शक्तिमानच्या चाहत्यांना विनंती करतो की कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका,जी माझ्याकडून किंव माझ्या निर्मात्याकडून तुमच्यापर्यंत आलेली नाही. आम्ही कोणालाच अद्याप साइन केलेलं नाही. शक्तिमान भारताचे नेतृत्व करणार आहे अशा कोणत्याही छोट्या-मोठ्या अफवेपेक्षा तो कितीतरी मोठा विषय आहे.’

Tags: Instagram Postmukesh khannaShaktimanSuperhero ShaktimanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group