Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार..; सागर कारंडेचा शेतात ट्रॅक्टर चालवितानाचा व्हिडीओ व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 22, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sagar Karande
0
SHARES
119
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील चला हवा येऊ द्या हा अत्यंत लोकप्रिय असा कार्यक्रम आहे. ज्याच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपली अशी हक्काची जागा कायमस्वरूपी मिळवली आहे. या कलाकारांपैकी एक म्हणजे आपला सागर कारंडे. मस्त मौलाना, प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कधी स्त्री वेष घेऊन तर कधी निळू फुलेंचा आवाज काढून हास्याचे चौकार षटकार मारणारा सागर हा प्रेक्षकांचा अत्यंत लाडका विनोदवीर आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये तो चक्क ट्रॅक्टर चालवताना दिसतोय.

View this post on Instagram

A post shared by Saagar Karande 😍 (@saagarkarande)

अभिनेता सागर कारंडे हा कॉमिक शो, मराठी चित्रपट यांसह नाटकामध्येही काम करतो. सध्या त्याच्या ‘हिच तर फॅमिलीची गंमत’ या नाटकाच्या दौऱ्यासाठी तो मुंबईबाहेर गेला आहे. यादरम्यानचाच हा व्हिडीओ आहे. आपल्या संपूर्ण नाटकाच्या टीमसोबत सागरने थेट कराड गाठलं आहे. होय. साताऱ्यातील कराड तालुक्यात सागर कारंडेचे गाव आहे. त्यामुळे अनायसे दौरे होतच आहेत तर गावी जाऊयाचं म्हणत सागरने गावचं घर गाठलं.

View this post on Instagram

A post shared by Saagar Karande 😍 (@saagarkarande)

आपल्या संपूर्ण टीमसह त्याने गावी भरपूर मजा केली. कधी नदीकाठी बसून गावच्या वातावरणाचा आनंद लुटला. तर कधी शेतात चक्कर मारली. इतकंच काय तर ट्रॅक्टरसुद्धा चालवला. याचवेळी हि व्हिडीओ करण्यात आला आहे आणि सागरने तो शेअर देखील केलाय.

View this post on Instagram

A post shared by Saagar Karande 😍 (@saagarkarande)

सागरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो आपल्या शेतात मस्तपैकी ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतो आहे. सागरने हा कमाल व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘ट्रॅक्टर ऑन ट्रॅक’.

View this post on Instagram

A post shared by Saagar Karande 😍 (@saagarkarande)

तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये तो मित्र- मंडळीसोबत नदीवर गेला आहे. जिथे त्याचे दोस्त मस्त नदीकाठी बसले आहेत. तर एक मित्र नदीमध्ये पोहोताना दिसत आहे. सागरच्या ट्रॅक्टर चालवण्याच्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलंय कि, ‘सुपर से भी उपर’. तर दुसऱ्याने लिहिले कि, ‘Driver काम सोप नसते रे बाबा’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘मातीशी नाळ जोडलेला एक सच्चा कलाकार.’

Tags: Instagram Postmarathi actorSagar KarandeViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group