हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच काही वर्षांपूर्वी नवे नवे उदयास आलेले सगळे गायक एका बाजूला आणि अमृता फडणवीस एका बाजूला. अमृता फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत. पण त्यांची प्रसिद्धी त्यांच्या गायन कौशल्यामुळे अधिक आहे. आतापर्यंत अमृता यांची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. यातील काहींना नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला तर काहींनी प्रचंड टीकांचा मारा केला. नुकतेच दिवाळीच्या निमित्ताने अमृता यांनी लक्ष्मी मातेचे स्तुतीस्तवन गायले आहे. खरंतर अमृता यांच्याकडून श्रोते मंडळींसाठी हे दिवाळी गिफ्ट होतं. पण लोकांना काही हे गिफ्ट आवडलेलं नाही.
सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांचा मोठा चाहतावर्ग आहे. पण तितकाच मोठा ट्रोलर्सचा ग्रुप त्यांना ट्रोल करण्यासाठी नेहमीच सज्ज असतो. वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने अमृता आपल्या नवनवीन गाण्यांनी चाहत्यांना आश्चर्यचकीत करत असतात. यापूर्वी रिलीज झालेली त्यांची अनेक गाणी लोकप्रिय ठरली तर काही गाणी ट्रोलसुद्धा झाली. यावेळी दिवाळी आणि लक्ष्मी पुजनाच्या निमित्ताने त्यांनी एक नवे गाणे गायले. याची माहिती देताना त्यांनी सांगितले कि, ‘दिवाळी २०२२ आणि लक्ष्मी पूजेच्या शुभप्रसंगी माझी लक्ष्मी मातेसाठीची आरती ऐका आणि देवीच्या भक्तीत तल्लीन व्हा, प्रेम से बोलो, ॐ जय लक्ष्मी माता …!’ अपेक्षा होत्या कि हे गाणे चांगले लोकप्रिय ठरेल. पण जितके कौतुक तितक्या टीकादेखील या गाण्यावर झाल्या आहेत.
एका नेटकऱ्याने या गाण्याच्या अधिकृत व्हिडिओवर कमेंट करीत लिहिले आहे कि, ‘कोरस जास्त चांगल्या आवाजात आहे..ऑटोट्यून की जय हो!’ तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘नवऱ्याने सर्व लाड पुरवावे.. मी पण एक नवरा आहे.. पण घरादाराची अब्रू जाईल तेवढं तारतम्य पाहिजे… असो दिवाळीच्या शुभेच्छा!’ इतकेच नव्हे तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘आली अवदसा परत… आख्या दिवाळीची वाट लावायला.’. तर अन्य एका नेटकऱ्याने असेही लिहिले आहे कि, ‘हे ऐकून घरातील लक्ष्मी बाहेर पळाली नाही म्हणजे मिळवले’. तर आणखी एकाने म्हटलंय कि, ‘कानातून रक्त आल गाणं ऐकून’ . तर आणखी एकाने लता मंगेशकर यांच्यासोबत तुलना करत लिहिले की, ‘नवीन लता मंगेशकर…या आवाजाला भारतरत्न मिळाला पाहिजे.’
Discussion about this post