हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते याने दिग्दर्शित केलेला आणि २००९ साली आलेला ‘झेंडा’ हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड भावला. पक्षपक्षातील राजकारण आणि नात्यानात्यात आलेली कटुता यार भाष्य करणारा हा एक राजकीय शैलीतील चित्रपट होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला प्रचंड प्रेम दिले आणि हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर उचलून घेतला. शिवसेना- मनसे या दोन पक्षातला आणि ठाकरे कुटुंबातला राजकीय थरार यामध्ये दाखवला होता. यांनतर आता ‘झेंडा २’ चित्रपट घेऊन अवधूत पुन्हा एकदा एका राजकीय नेत्याच्या जीवनावर भाष्य करणार आहे.
‘झेंडा’ हा चित्रपट मराठीतील एक अत्यंत महत्वाचा चित्रपट असून अवधूतचा पहिला दिग्दर्शन केलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटानंतर त्याने अनेक चित्रपट केले. पण ‘झेंडा’ची लोकप्रियता काही औरच होती. या चित्रपटानंतर बराच काळ लोटून गेला आहे. पण प्रेक्षकांना आजही झेंडा २ ची प्रतीक्षा होती आणि म्हणून आता अवधूत गुप्तेने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा करीत प्रेक्षकांना आनंदी केले आहे. जामनेर येथे भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यातर्फे अवधूत गुप्तेच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाबाबत मनोगत व्यक्त करताना त्याने हि घोषणा केली आहे.
या कार्यक्रमादरम्यान अवधूतने मंत्री गिरीज महाजन यांची मुलाखत देखील घेतली. यावेळी अवधूतच्या रोखठोक प्रश्नांवर महाजनांनी दिलेली उत्तरे त्याला भावली. या उत्तरांमधून महाजन यांचा राजकीय प्रवास उलघडला. यानंतर मनोगत व्यक्त करत अवधूत म्हणाला कि, ‘कार्यकर्ते जेवढे हतबल असतात तितकाच नेता हतबल असतो हे दाखवणारा ‘झेंडा २’ चित्रपट असू शकतो. जळगाव जिल्ह्याला गिरीश महाजनसारखं नेतृत्व लाभलं. भाजपातील ज्येष्ठ नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांना या प्रवासात घरापासून पक्षापासून अनेक आव्हानांचा, विरोधाचा सामना करावा लागला. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या राजकीय संघर्षावर भविष्यात झेंडा चित्रपट चित्रपट करण्याची माझी इच्छा आहे.’
Discussion about this post