हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर चित्र विचित्र फॅशन करून सतत चर्चेत राहणारी उर्फी जावेद कितीही ट्रोल झाली तरी स्वतःचा युनिक फॅशनचा हट्ट सोडत नाही. यामुळे अनेकदा ट्रोलर्स वैतागून तिला अद्वा तद्वा बोलताना मागे पुढे पाहत नाहीत. पण याचा उर्फीच्या फॅशनवर किंवा जीवशैलीवर काहीच फरक पडत नाही हे खरं. मात्र कदाचित आता तिला याचा फरक पडेल. कारण तिच्या बोल्ड फॅशनमूळे अर्थात अंग प्रदर्शन केल्यामुळे संस्कृतीचा अपमान झाल्याचे म्हणत दिल्ली पोलिसांत काही लोकांनी तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
त्याच झालं असं कि, नुकतीच दिवाळी पार पडली आहे. यानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये उर्फीचा देखील समावेश आहे. यावेळी तिने दिवाळीच्या शुभेच्छा देताना केलेली फॅशन मात्र लोकांच्या डोक्यात गेली. तिने कोणताही टॉप परिधान न करता फक्त घागरा परिधान केला होता. या व्हिडिओमध्ये तीचे हावभाव देखील अश्लील होते असे म्हणत तक्रार दारांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. या फॅशनवरून अनेकांनी तिला सोशल मीडियावर देखील ट्रोल केले आहे.
याशिवाय तिचं नुकतच ‘हाय हाय ये मजबूरी’ गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यातही तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी या गाण्याचा देखील संदर्भ दिल्ली पोलिसांना दिला आहे. दिल्लीत बोल्ड कपडे परिधान केल्याबद्दल पोलिसांनीदेखील हि तक्रार दाखल करून घेतली आहे. हि दिवाळी अनेकांना गोड गेली पण उर्फीला मात्र तिखट गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. तिची फॅशन आणि तिचा बोल्डनेस तिच्यावरच भारी पडणार आहे असे दिसत आहे. आता या अडचणीतून ती कशी मार्ग काढते हे महत्वाचे ठरणार आहे.
Discussion about this post