Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘उगाच ही सीरियल पुन्हा सुरू केली’; ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील ट्विस्टमुळे प्रेक्षकांचा हिरमोड

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 28, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mazi Tuzi Reshimgath
0
SHARES
4.6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ हि मालिका काही दिवसांपूर्वी निरोप घेता घेता राहिली. खरतर मालिकेच्या मेकर्सने मालिकेचा शेवट करून प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. पण प्रेक्षकांच्या आग्रहाखातर हि मालिका पुन्हा नव्या जोमाने सुरु करण्यात आली. गेल्या काही एपिसोडमध्ये मालिकेत इतके बदल झाले कि, ते पचवतांना प्रेक्षकांनाही अवघड होतंय. एकीकडे मिथिला काकूचं बाळ गेलं, दुसरीकडे यश नेहाचा अपघात झाला, मग नेहा बेपत्ता झाली. यानंतर नेहा हयात नाही समजून काळ पुढे सरकला आणि आता अचानक नेहा पुन्हा आली आहे फक्त रूप आणि नाव वेगळं दाखवलं आहे. हे सगळं इतकं पटापट झालं कि प्रेक्षकही गांगरले आहेत. अशी स्टोरीलाईन पाहून त्यांचा संताप संताप होऊ लागलाय.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

चौधरी कुटुंबावर मोठा आघात झाला. यश नेहाच्या अपघातानंतर नेहाचे निधन झाल्याचे मालिकेत दाखवले आहे. यानंतर मालिकेत नेहाची स्मृति गेली असून तिची नव्याने एंट्री दाखवली आहे. त्यामुळे मालिकेत मोठा ट्विस्ट आलाय. नेहाचा लूक, नाव आणि ओळख सगळंच बदललं आहे. नेहाऐवजी तिची ओळख अनुष्का अशी झाली आहे. शिवाय जयंतीलाल मेहता आणि कुटुंब अशा नव्या एन्ट्रीने प्रेक्षक आणखीच गोंधळले आहेत. या सर्व प्रकारामुळे आता हि सिरीयल बंद झाली होती ती उगाच सुरु केली असे प्रेक्षकांना वाटू लागले आहे. नव्याने सुरु झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांचा हिरमोड केला आहे. त्यामुळे मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी संताप व्यक्त करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘काय फालतुगिरी आहे.. झी मराठीलाच मरुन जिवंत होतात’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘काय फालतू पण आहे स्टोरी नसेल तर बंद करा मालिका , वेड लागलं आहे मराठी सीरियलला स्टोरी नसली की ही बुध्दीभ्रष्टचे सीन दाखवतात …सर्व काही टीआरपी आणि पैश्यासाठी बाकी प्रेक्षकांना काही भाव नाही.. चांगल्या सीरियल ची वाट लावणार MTR best होती पण आता’.

तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘मूर्खपणा सुरू झाला आहे… एपिसोड लिहिणारा दरीत पडला होता की नेहा? नेहा, यश आणि परी हे एकत्र असतील तरच रेशीमगाठ घट्ट होईल… आता असं वाटतं आहे की उगाच ही सीरियल पुन्हा सुरू केली… गोष्ट पुढे चालू ठेवावी म्हणून काहीही दाखवणार का आता?’

Tags: Fans Got AngryInstagram PostMazi Tuzi ReshimgathViral PromoViral VideoZee Marathi Serial
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group