हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉस मराठी सुरु आहे. यंदा बिग बॉस मराठीचे चौथे सीजन सुरु असून एकदम जोरदार चालू आहे. या शोमध्ये सहभागी झालेले जवळ जवळ सगळेच स्पर्धक जिंकण्याची पूर्ण तयारी करून आले आहेत असे दिसत आहे. बिग बॉसच्या घरातली कॅप्टन्सी किती आणि का महत्वाची आहे हे तर आपण सारेच जाणतो. पण ती मिळवणे इतके पण सोप्पे नाही हे देखील आपण जाणतच असाल. म्हणूनच यावेळी घरातील नवा कॅप्टन निवडण्यासाठी बिग बॉसने हातातील सदस्यांना ‘धुवून टाक’ हे कॅप्टन्सी कार्य सोपविले. हे कार्य जिंकून अक्षयने बिग बॉस हाऊसचे कॅप्टनपद पटकावले आहे.
कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर काही प्रोमो शेअर करण्यात आले आहेत. यातील पहिल्या प्रोमोत आपण पाहू शकतो कि सगळे सदस्य लिव्हिंग रूममध्ये बसले आहेत आणि बिग बोस सांगतात कि, ‘कॅप्टनच्या रूममध्ये ज्याची पोहोचेल सर्वप्रथम स्वारी, त्याला मिळेल कॅप्टन पदाची उमेदवारी!’ मग काय सगळेच सुसाट धावतात. अगदी एकमेकांच्या अंगावरून, सोफ्यावरून उड्या मारून हे स्पर्धक कॅप्टनच्या रूममध्ये शिरतात. दरम्यान यावेळी अक्षय केळकर आणि विकास सावंत हि उमेदवारी जिंकतात.
यानंतर दुसऱ्या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो कि, घरातील कॅप्टन्सी उमेदवारी जिंकलेले स्पर्धक एकमेकांविरुद्ध बिग बॉसचे कॅप्टन्सी कार्य खेळायला तयार आहेत. विकास आणि अक्षय यांच्यातील एक कप्तान निवडण्यासाठी घरातील सदस्यांना बिग बॉसकडून ‘धुवून टाक’ हे कॅप्टन्सी कार्य देण्यात आले आहे. यामध्ये दोन्ही स्पर्धकांना आपापले डिस्प्ले आकर्षकरित्या तयार करायचे आहेत. तर दुसरीकडे समोरील उमेदवाराचे समर्थक आपला डिस्प्ले खराब करू शकतात. यापासून उमेदवारांनी आणि त्यांच्या स्पर्धकांनी आपापले डिस्प्ले वाचवायचे आहेत. हा टास्क पूर्ण केल्यानंतर संचालिका अमृताने अक्षय केळकर याला विजयी घोषित केले आणि त्यामुळे अक्षय बनला नवा कॅप्टन.
Discussion about this post