हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे दरवर्षी अधिकाधिक सिनेमे रिलीज होत असतात. सध्या त्याचा ‘रामसेतु’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान चालतोय. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी ८.७५ कोटी एवढी कमाई केलीय. तसेच एकूण ४१.४५ कोटी इतकी कमाई करीत ‘रामसेतु’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. याच दिवशी बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या ‘थँक गॉड’ या सिनेमाची ४.१५ तर एकूण २१.५५ कोटी एवढी कमाई केली आहे. रामसेतूच्या तुलनेत थँक गॉडची कमाई खूप कमी आहे.
यंदाची दिवाळी अक्षय कुमारसाठी खऱ्या अर्थानं ‘शुभ दिपावली’ ठरली आहे. ‘रामसेतु’च्या कथा नास्तिक पुरातत्वशास्त्रज्ञ आर्यन कुलश्रेष्ठ म्हणजेच अक्षय कुमारच्या भोवती फिरते. यातच आता अजय देवगणचा ‘थँक गॉड’ ह्या सिनेमात पाप पुण्याचा फेरा आणि त्याचा हिशोब या संकल्पनेवर हा सिनेमा आधारित आहे.
‘रामसेतु’ या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केल आहे. या सिनेमाची पहिल्या दिवशी १५.२५ कोटी इतकी जबरदस्त ओपनिंग केली. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी ११.४० कोटी, तिसऱ्या दिवशी ८.७५ कोटी, तर चौथ्या दिवशी ६.०५ कोटी पर्यंत कमाई केली आहे.
तगडी आणि मोठी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा होता. या सिनेमात अजय देवगण, रकुल प्रीत आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी या सिनेमात काम केलं आहे. स्टारकास्ट असूनही थँक गॉड सिनेमाच्या कमाईला ग्रहण लागलं आहे. पहिल्या दिवशी या सिनेमानं ८.१ कोटी तर दुसऱ्या दिवशी ६ कोटी, तिसऱ्या दिवशी ४.१५ कोटी रुपये तर चौथ्या दिवशी ३.३ कोटी इतकी कामे केली. हि मिळून २१.५५ कोटी इतकी कमाई झाली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केलं आहे.
Discussion about this post