हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीवरील अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉसचा १६ वा सीजन एकदम जोरदार चालू आहे. या सिजनमधील सगळेच स्पर्धक चुरशीने खेळत आहेत. पण तरीही या सगळ्यांमध्ये प्रेक्षकांचा सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला स्पर्धक म्हणजे अब्दु रोजिक. अलीकडेच नॉमिनेशन कार्यात अब्दू रोझिकला नॉमिनेट करण्यात आलं आणि यानंतर बिग बॉस शोच्या टीआरपीवर परिणाम झाला. यानंतर शुक्रवार का वारमध्ये सलमान खान डेंग्यूतून बरा होऊन पुन्हा परतल्याचे दिसले. यावेळी त्याने घरातील सदस्यांना झाप झाप झापले. शिवाय अब्दूला घराबाहेर येण्याचा आदेशदेखील दिला. त्यामुळे आता अब्दू घरातून बाहेर पडणार का..? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
कलर्स टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हायरल झालेल्या प्रोमोनुसार, शोचा होस्ट सलमान खान अब्दुला घराबाहेर यायला सांगतो. हे ऐकून घरातील सगळेच सदस्य हादरतात. अब्दु जाणार हे ऐकून सगळ्या स्पर्धकांना रडू कोसळतं. यावेळी अब्दुचा दोस्त मराठमोळा शिव ठाकरे फारच दुःखी होतो. कारण बिग बॉस हाऊसमध्ये शिव आणि अब्दु यांची चांगली गट्टी झाली होती. त्यामुळे अब्दू जाणार म्हणताच शिवचा चेहरा उतरतो. हा प्रोमो पाहून अनेक प्रेक्षक देखील दुखी झाले आहेत. पण मुळात दुखी होण्याच कारण नाही. कारण, अब्दु घराबाहेर जाणार नाहीये. तर इतर सदस्यांना अद्दल घडवण्यासाठी सलमान त्याला घराबाहेर जाण्याचा आदेश देणार आहे.
याचे मुख्य कारण असे आहे कि, घरातले इतर सदस्य सतत अब्दुला बोल लावताना दिसतात. अनेकदा अब्दुची चूक नसतानादेखील त्याच्यावर खापर फोडले जाते. गेल्या आठवड्यात मुद्दाम अब्दुला घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करण्यात आलं. म्हणून घरातील सदस्यांना धडा शिकवण्यासाठी आणि अद्दल घडविण्यासाठी सलमान नाटक करतोय. याशिवाय आणखी एक मोठी बाब म्हणजे यावेळी घरातील कोणताही सदस्य घराबाहेर जाणार नाहीये. कारण या वीकमध्ये एलिमिनेशन नाहीये.
Discussion about this post