हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स हिंदीवरी बिग बॉस १६ हे पर्व सध्या कमालीचे लोकप्रिय ठरत आहे. आतापर्यंत बिग बॉसच्या या पर्वातून २ एलिमिनेशन झाले आहेत. ज्यामध्ये श्रीजीता डे आणि मान्या सिंग यांना घराबाहेर जावं लागलं. तर गेल्या आठवड्यात घरात कोणतेही एलिमिनेशन न झाल्यामुळे घरात १४ सदस्य बाकी आहेत. यांपैकी शालीन भनोत हा सदस्य वारंवार त्याच्या चिकनच्या विषयामुळे प्रचंड चर्चेत राहिल्याचे दिसले आहे. बघावं तेव्हा मला चिकन हवंय, मला गरज आहे, माझी तब्येत बिघडेल असं तो बोलताना दिसतो. यावेळी बिग बॉसलाही स्वतःचा राग आवरला नाही आणि शेवटी बिग बॉस त्याच्यावर वैतागलेच.
सोशल मीडियावर एक प्रोमो व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शालीन सतत बिग बॉसकडे चिकनची मागणी करताना दिसतो आहे. तो म्हणतोय कि, बिग बॉस जरा कन्फर्म करून सांगा कि तुम्ही माझं चिकन पाठवणार आहात कि नाही..? यावर बिग बॉसने शालिनला थेट कन्फेशन रूममध्ये बोलावून घेतले आणि झाड झाड झाडले आहे. यावेळी बिग बॉस म्हणाले कि, ‘शालीन तुम्हाला या घरात फक्त एकाच गोष्टीशी घेणं देणं आहे आणि ते म्हणजे तुमचं १५० ग्रॅम चिकन जे तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. ते घ्या आणि घरात जा. पण तुमची ॲक्टिंगची ऑडिशन बंद करा.’
आतापर्यंत घरातही शालीनच्या चिकन चिकन करण्यामुळे खूप भांडण झाल्याचे पहायला मिळाले. पण माझी मेडिकल गरज आहे असं सांगून नेहमीच शालिनने सगळ्यांची तोंड बंद केली आहेत. यावेळी मात्र चिकनवरून बवाल झाला. सगळे सदस्य एकत्र बसलेले पाहायला मिळत आहे. जिथे अब्दू शालीनच्या चिकन प्रेमावरून मस्करी करताना दिसतोय. हे पाहून सगळेच हसतात. दरम्यान प्रियांका देखील एखादी कमेंट करते आणि यावर शालीन भडकतो. म्हणतो, ‘माझ्या प्रोटीनची मस्करी बनवून ठेवली आहे.’ यावरून प्रियांका म्हणते कि, ‘अब्दू चिडवत होता तेव्हा तर काहीच बोलला नाहीस. मग आता काय झालं..? यावर शालीन तिच्यावर आवाज चढवतो मग प्रियांकाही तिचा आवाज चढवताना दिसते.
Discussion about this post