हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे ती नेहमीच विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असल्यामुळे तिच्या पोस्टवर मोठ्या संख्येने लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडत असतो. प्राजक्ताच्या चाहत्यांच्या विविध तऱ्हा आहेत. प्रत्येक वयोगटात तिचे चाहते आहेत. प्राजक्ताच्या पोस्टवर कमेंट करून हे चाहते आपल्या भावना नेहमीच व्यक्त करत असतात. आतापर्यंत काही चाहत्यांनी तर प्राजक्ताला थेट लग्नाची मागणीसुद्धा घातली आहे. आता यावेळी एक चाहता तिच्यावर प्रेमाचा आरोप करतोय.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिच्या नव्या लूकमधील क्लासी फोटोस शेअर केले आहेत. या फोटोंसह तिने अतिशय मोहक असे कॅप्शन दिले आहेत. ज्यामध्ये तिने लिहिले आहे कि, ‘तो बात बन जाए…हां हां बात बन जाए…’ शिवाय या फोटोंमध्ये प्राजक्ता एकदम ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. तिचा हा लूक होऊन कुणीही फ्लॅट होणं अत्यंत स्वाभाविक आहे. असच काही चाहत्यांच्या बाबतीत झालं आहे. प्राजक्ताचा हा लूक पाहून अनेकांच्या दिलात प्रेमाची घंटी वाजली आहे. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या पोस्टवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘हीच्यामुळे मी अजून लग्न केलं नाही’. अशा प्रेमळ आरोप करणाऱ्या चाहत्याची कमेंट चांगलीच चर्चेत आली आहे. यावर काहींनी मग करून घ्या लग्न असंही म्हटलं आहे. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘तुझी माझी क्रश प्राजु मला तुझा फोटो खूप आवडतो आणि जवळजवळ दोन दिवस तुझ्या पिक्चरची वाट पाहत होतो खूप छान चित्र मला तुझ्याबद्दल वेड लावते प्राजू तुझ्यावर प्रेम करते’ तर आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे कि, ‘एकही दिल है.. कितनी बार जितोगे..?
Discussion about this post