हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा चौथा सीजन फुल्ल ऑन मिरचीचा तडका आहे. या घरात सारखा कुठे ना कुठे जाळ आणि धूर निघतंच असतो. कधी बाचाबाची, कधी हमरी तुमरी, कधी मारामारीच्या आसपास, कधी शिव्यांचा भडीमार. हे सगळं या घरासाठी रोजचं झालं आहे. याहीवेळी दोन स्पर्धकांमध्ये असंच वातावरण पेटल्याचे दिसलं. बिग बॉस मराठीचे स्पर्धक प्रसाद आणि समृद्धी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी फक्त काय ती मारामारी राहिली होती.
नुकताच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये समृद्धी आणि प्रसाद एकमेकांवर आवाज चढवून भांडताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये प्रसाद समृध्दीमध्ये जवळपास शाब्दिक गोळीबार सुरु होता. आतापर्यंत आपण समृद्धी- प्रसादला या घरात जसं पाहिलंय त्याप्रमाणे हा वाद व्हायचा होताच. या प्रोमोत प्रसाद समृद्धीला सांगताना दिसतो आहे कि, ‘धीर धरना जरा सगळ्यांना येऊ देत, मग ऐकव ना..?’ त्यावर समृध्दी बोलताना दिसतेय कि ‘आई शपथ… हा डोक्यात जातो यार…’ यावर प्रसाद एक मिनिटही जाऊन न देता लगेच प्रत्युत्तर देत म्हणतो कि, ‘तू पण डोक्यात जातेस.’
आता प्रसादने प्रत्युत्तर दिल्यावर थोडीच समृद्धी गप्प बसेल. समृद्धीचं ती… या प्रत्युत्तरानंतर समृद्धी थेट प्रसादला दम भरत म्हणते कि, ‘प्रसाद गप्प बस…आणि नीट रहा प्रसाद …’ मग काय.. कोण कसं बरोबर यावरून इथे वाद सुरु झाला जो थांबेनाच. दरम्यान समृद्धी प्रसादच्या अंगावर धावून जाते. यावेळी अंगावर धावून आलेल्या समृध्दीला प्रसाद लांब राहा असं म्हणतो. त्यावर ‘तू पण लांब राहत जा’ असं समृद्धी म्हणते. यावर प्रसाद तिला येडी कुठली असं म्हणतो… आता हे भांडण इथेच संपलं.. थांबलं कि पुन्हा पेटलं..? हे पाहण्यासाठी आजचा भाग पहा.
Discussion about this post