हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अशा बड्या बड्या कलाकारांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. यामध्ये बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान अशा अत्यंत लोकप्रिय कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. या धमक्यांची सूत्र पाहता पोलीस प्रशासनाचे काही ठोस पाऊले उचलल्याचे आता समोर आले आहे. मंगळवारी अभिनेता सलमान खान याला पोलिसांपासून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याचे समोर आले. यानंतर आज अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ करीत त्यांना पुढील काळात X दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
माहितीनुसार, बॉलीवूड इंडस्ट्रीचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत आधीपेक्षा आता अधिक वाढ करण्यात आली आहे. त्यांना येत्या काळात एक्स दर्जाची सुरक्षा मुंबई पोलिसांकडून दिली जाणार आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन याना प्रशासनाकडून केवळ सामान्य दर्जाची सुरक्षा दिली जात होती. मात्र अमिताभ बच्चन यांच्या आसपास असणारे प्रसिद्धीचे वलय पाहता त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अलीकडे अमिताभ यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. शिवाय बॉलिवूडमधील अन्य काही बड्या कलाकरांना येणाऱ्या धमक्या पाहता अमिताभ यांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणूनच पोलीस प्रशासनाचे हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra | Mumbai police to provide Y+ security cover to actor Salman Khan. The step has been taken by the state govt after the actor received a threat letter from Lawrence Bishnoi gang earlier: Maharashtra Police
(File Pic) pic.twitter.com/0CjJuE3Zqm
— ANI (@ANI) November 1, 2022
कोणाला सुरक्षा देणे आवश्यक आहे आणि कुणाला नाही याबाबतीत सर्व निर्णय हे इंटेलिजन्स डिपार्टमेंटकडून घेतले जातात. हे निर्णय कोणत्याही आपसी विचारांनी नव्हे तर त्यांनी केलेल्या सर्व्हेनुसार संबंधित व्यक्तीबाबत सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या निकषावरून अंतिम केले जातात. कोणत्या व्यक्तीची किती लोकप्रियता आहे..? त्या व्यक्तीच्या जीवाला किती धोका असू शकतो..? अशा काही मुद्द्यांवर बारकाईने अभ्यास करीत सुरक्षेबाबत यंत्रणा निर्णय घेत असते. या सुक्षेत मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचारी तीन शिफ्टमध्ये संबंधित व्यक्तीला सुरक्षा देण्याचे काम करत असतात.
Discussion about this post