हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ये रिश्ता क्या कहलाता है या हिंदी मालिकेतील अक्षराची भूमिका साकारणारी अभिनेत्री हिना खान हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे सोशल मीडियावर नेहमीच ती विविध कारणांमुळे चर्चेत राहते. तिचे अनेक फोटोशूट इंस्टा, फेसबुक आणि अन्य माध्यमातून चांगलेच व्हायरल होताना दिसतात. नुकतेच तिने एक नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. जे पाहून तिचे चाहते तिच्या आऊटफिटच्या प्रेमात पडले आहेत. मात्र तिने दिलेल्या पोझ पाहून भल्याभल्यांचं मस्तक फिरलंय. अनेकांनी यासाठी तिला ट्रोल केलं आहे.
अभिनेत्री हिना खानने तिच्या नव्या अंदाजात नवे फोटोशूट अधीकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. यामध्ये हिनाने डार्क ब्ल्यू कलरचा हॉल्टर नेक जंपसूट परिधान केला आहे. तिचा हा लूक बराच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. त्यामुळे हे फोटोशूट शेअर केल्यानंतर काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोशूटमध्ये हिनाने बॉडीचे जसे पोश्चर दिले आहे ते पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. प्रत्येकवेळी अशा पोश्चर देणे किंवा पोझ करणे गरजेचे आहे का..? असेही अनेकांनी म्हटले आहे.
अभिनेत्री हिना खान बऱ्याचदा बिकिनी, ब्रालेट आणि बॉडीकॉन परिधान करून विविध अंदाजात हॉट तसेच बोल्ड फोटोशूट करणे पसंत करते. इतकेच नव्हे तर तिचे या ड्रेसेसमधील फोटो ती आपल्या सोशल मीडियावर शेअरदेखील करताना दिसते. तिचे चाहते तिच्या अदा आणि तिच्या फॅशनसेन्सचे भरभरून कौतुक करतात. पण प्रत्येकवेळी चाहतेसुद्धा पसंती देतीलच असं काही नाही. असंच काहीसं यावेळी झालं आहे. हिना खानच्या फोटोशूटमधील बऱ्याच पोझ आक्षेपार्ह असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
Discussion about this post