हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केरळ राज्यात ३२ हजार महिला अगदीच संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्या होत्या. माहितीनुसार, ISIS या दहशतवादी संघटनेने त्यांचं अपहरण केलं होत. या विषयावर पुन्हा कधीच वाच्यता झाली नाही. पण गेली चार वर्ष सुदिप्तो सेन यांनी सखोल संशोधन आणि अभ्यास करून ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट रचला आहे. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित असून केरळ आणि मँगलोरमधील जवळपास ३२ हजार महिलांच्या अपहरणावर हे कथानक भाष्य करते. नुकताच याचा टिझर प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री अदा खान पहायला मिळत आहे.
या टीझरमध्ये अभिनेत्री अदा खान तिच्या या भूमिकेची ओळख करून देताना दिसतेय. यात ती म्हणते कि, ‘माझं नाव शालिनी उन्नीकृष्णन आहे. मला नर्स बनून लोकांची सेवा करायची होती. पण मी आता फातिमा बा झाली आहे. अफगाणिस्तानच्या तुरुंगात मी एकटी नाही तर माझ्यासारख्या ३२ हजार मुली आहेत. ज्यांचं धर्मांतर झालंय. त्यांना सीरिया आणि येमेनच्या वाळवंटात दफन करण्यात आलंय. केरळमध्ये उघडपणे सर्वसामान्य मुलीला दहशतवादी बनवण्याचा भयानक खेळ सुरू आहे. याला कोणी थांबवणार नाही का..? ही माझी कहाणी आहे.. ही त्या ३२ हजार मुलींची कहाणी आहे.. ही केरळची कहाणी आहे.’
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, २००९ सालामध्ये केरळ आणि मँगलोरमधून जवळपास ३२ हजार हिंदू आणि ख्रिश्चन धर्मीय मुलींचे अपहरण करण्यात आल्याची अत्यंत मोठी घटना घडली होती. ISIS या दहशतवादी संघटनेने या मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर बळजबरी करून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावला होता. त्यांच्यापैकी बहुतांश मुलींना यानंतर सीरिया, अफगाणिस्तान आणि इतर भागात पाठवलं गेलं. या मुली पुन्हा कधीही घरी परतल्याच नाहीत, असे सांगण्यात येत आहे. हि घटना जगभरातील कित्येक लोकांना आजही माहित नाही. म्हणूनच या घटनेवरून पडदा उघड करण्यासाठी सुदिप्तो सेन यांनी ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट बनविला आहे.
Discussion about this post