Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘एव्हढं छपरी कसं काय वागतोस..?’; हिमेश रेशमिया आगामी सिनेमामुळे ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 5, 2022
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
136
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक हिमेश रेशमियाने आपल्या आवाजाची जादू तर आधीच दाखवली आहे. त्यामुळे जगभरात त्याच्या गायकीचे अनेक चाहते आहेत. पण दुसऱ्या बाजूला त्याच्या गायकीवर निशाणा साधणाऱ्यांची पण काही कमी नाही. त्यात हिमेश रेशमिया अनेकदा गायनासोबत आपला अभिनयाचा छंद पूर्ण करताना हमखास दिसतो. येत्या काळात त्याच्या ‘बॅडऍस रवी कुमार’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. याचा टिझर पाहून आणि चित्रपटातील पहिलं गाणं ऐकून ट्रोलर्सने हिमेशला चांगलंचं भरडलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh)

‘बॅडऍस रवी कुमार’ या सिनेमामध्ये हिमेश रेशमिया मुख्य भूमिकेत म्हणजेच रवी कुमार या भूमिकेत दिसणार आहे. याआधी २०१४ सालामध्ये हिमेशने ‘द एक्सपोज’ या चित्रपटात रवी कुमारची भूमिका साकारली होती. याच भूमिकेचा हा नवा व्हर्जन आहे असे म्हटले जात आहे. या भूमिकेवर गेल्या ८ वर्षांत न जाणे कित्येकांनी विविध दर्जाचे मीम्स बनविले आहेत.

यानंतर आता पुन्हा तेच. यामुळे हिमेशने स्वतःहून स्वतःला ट्रॉलर्सच्या स्वाधीन केले आहे, असेच वाटत आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. व्हायरल टीझरमध्ये हिमेश बरेच अॅक्शन सीन्स देत आहे. हे पाहून नेटकऱ्यांनी त्याला आणखीच ट्रोल केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh)

अलीकडेच स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान यानेसुद्धा हिमेशच्या आगामी चित्रपटावरून त्याची खिल्ली उडवली आहे. ‘हिमेशच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून ट्रोलर्सनेसुद्धा हिमेशची पाठ धरली आहे. अनेकांनी म्हटलं आहे कि, बस कर रे बाबा.. कितीवेळा ट्रोल होशील.’ तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ;’बॉलीवूडला हाच वाचवू शकतो.’ इतकंच काय तर एकाने म्हटलं ते कि, ‘हॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांचं कौतुक पुरे. आता आपला रवीकुमारचं 14 ऑस्कर घेऊन येणार’. याशिवाय एकाने ‘एव्हढं छपरी पोस्टर कसं काय..?’ असं म्हटलं आहे.

Tags: Himesh ReshmiyaInstagram PostSocial Media TrollingUpcoming Bollywood FilmViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group