हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेक्षकांना काय हवंय..? प्रेक्षकांना काय पाहायचंय..? प्रेक्षकांना हे आवडेल का..? प्रेक्षक नाराज तर होणार नाहीत ना..? यासाठी एक कलाकार आपल्या आयुष्याचा खूप मतोह कालावधी प्रेक्षकांना समर्पित करीत असतो. या दरम्यान अनेक कलाकारांचे आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष होते. ज्यामुळे त्यांना विविध आजाराशी सामना करावा लागतो. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन याच्याबाबतीत असंच काहीसं झालंय. तो एका विचित्र आजाराशी लढा देतोय. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.
अलीकडेच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबाबत खुलासा केला आहे. अभिनेता वरुण धवन याने आगामी चित्रपट ‘भेडिया’मधील व्यक्तिरेखेविषयी काही माहिती दिली आणि या दरम्यान त्याने वैयक्तिक आयुष्यातील काही महत्वाच्या तसेच गंभीर गोष्टी शेअर केल्या. यामध्ये अभिनेता वरुण धवनने सांगितले की, ‘काही दिवस आधीपासून मी वेस्टीबुलर हायपोफंक्शन आजाराचा सामना करत आहे. मला माहित नाही,मला काय झालं आहे, पण आता मला कळतंय बॅलन्स खूप गरजेचा आहे आयु्ष्यात. पण माझी तीच गोष्ट बिघडली आहे. मी स्वतःला आता यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. आपण फक्त रॅट रेस मध्ये भाग घेतल्यासारखं पळतोय. खरंतर आपण या जगात एका ध्येयानं आलेलो आहोत असं मला वाटतं. आणि मी सध्या माझं तेच ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटत इतरांनाही त्यांचे ध्येय पूर्ण करता यायला हवे.’
अभिनेता वरुण धवनला झालेला ‘वेस्टिबुलर हायपोफंक्शन’ आजार म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मित्रांनो, कानातील एक समतोल नियंत्रित करणारी यंत्रणा असते जी यामध्ये व्यवस्थित काम करत नाही. कानाच्या आत वेस्टिबुलर सिस्टम असते. जी डोळ्यांच्या सहाय्यानं काम करते आणि आपल्या स्नायूंमध्ये तोल राखण्याचा प्रयत्न करते. जेव्हा ही यंत्रणा बिघडते तेव्हा कानाने ऐकू येणाऱ्या गोष्टी मेंदूपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत. ज्यामुळे अनेकदा व्यक्तीला स्वतःचा तोल सावरता येत नाही आणि त्याला चक्कर येऊ लागते.
Discussion about this post