हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीची चर्चा होती. यानंतर आज कपूर घरात आनंदी आनंद झाला आहे. कारण आलियाने अतिशय गोड चिमुकल्या कन्येला जन्म दिला आहे. त्यामुळे आता आलिया आई आणि रणबीर बाबा झाला आहे. तर नितु कपूर आज्जी झाल्या आहेत. हि बातमी सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखी पसरली आहे आणि त्यांचे चाहते आनंद साजरा करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत.
सुत्रांनुसार, आज सकाळी साडेसातच्या सुमारास आलियाला प्रसूतीसाठी गिरगाव येथील एच. एन. रिलायन्स (Sir H. N. Reliance Foundation Hospital) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. माहितीनुसार, आलिया आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. सोशल मीडियावर हि बातमी समजताच त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आलियाने प्रेग्नेंसीची बातमी दिल्यापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये येणाऱ्या बाळाविषयी उत्सुकता होती. यानंतर आता कपूर कुटुंबात इवल्याशा परीची एंट्री झाली आहे. जिला पाहण्यासाठी चाहते प्रचंड आतुर आहेत. अद्याप कपूर कुटुंबाकडून कोणीही अधिकृत स्टेटमेंट दिलेले नाही.
आलिया प्रेग्नेंट असतानाही तिचं काम करत होती. या दिवसांमध्ये ती ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ठिकठिकाणी उपस्थित राहिल्याचे दिसले. यावेळी तिने बेबी बंप फ्लोन्ट करीत विविध पोझ दिल्या होत्या. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. याशिवाय तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा कमाल ग्लो उतरल्याचे दिसून आले होते. यानंतर आज तिने बाळाला जन्म दिल्याची आनंद वार्ता समजताच तिचे चाहते तिच्या पहिल्या बाळाची झलक पाहण्यातही आतुर झाले आहेत.
Discussion about this post