हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘सबसे कातिल, गौतमी पाटील’ या युवतीची भारी चर्चा आहे. लावणी सादर करताना विविधप्रकारे चुकीचे हातवारे करणे, अदाकारी करणे यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं. तर उर्वरित समाजाने तिला डोक्यावर उचलून घेतलं. अलीकडेच गौतमीने सांगलीत मिरज तालुक्यातील बेडग येथे लावणीचा कार्यक्रम केला. कार्यक्रम गाजला पार शेवटी त्या परिसरात एक मृतदेह आढळून आला होता. या प्रकाराने सगळीकडे खळबळ उडाली. याआधी गौतमीचं लावणी सादर करताना अंगावर पाणी ओतून घेणे, वादग्रस्त इशारे करणे, विचित्र हावभाव या सगळ्यामुळे चर्चेत राहिली. दरम्यान लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी संताप व्यक्त केला होता. शिवाय मेघा घाडगे यांनीही गौतमीची भेट घेऊन तिची कानउघाडणी केली होती. मात्र आता सांगलीतील प्रकारानंतर मेघा ताई आणखीच भडकल्या आणि त्यांनी थेट फेसबुकवर राग व्यक्त केला आहे.
यासंदर्भात मेघा घाडगे यांनी फेसबूक पोस्ट लिहिली आहे. यात त्या म्हणाल्या आहेत कि, ‘खूप खूप धन्यवाद गौतमी पाटील. आज तुला लावणी क्वीन हा ‘किताब मिळाला. माफ कर खूप चूक झाली. खरंतर अशी लावणी असते हे आमच्या पूर्वज्यांना ही माहित न्हवत. का आम्हाला असं चुकीचं शिकवलं गेलं. का या शाहिरानीं कवन लिहिली??? पुस्तकातून चुकीचा लोककलेचा अभ्यास शिकवला. कृपाकारून बंद करा हे सगळं. विनाकारण लोककलवांतांनी पिढ्यान पिढ्या कलेच्या नावाखाली पुरस्कार घेत गेले आत्ता माझे डोळे उघडले. मीही या पुढे साडीचा पदर अंगावर घेणार नाही. पायाखालून कमरेपर्यंत येईल तेवढी साडी, परकर वर करेन आणि पाण्याची बाटली घेऊन अंगावर ओली चिंब होईपर्यंत ओतेन. पायात घुंगरू घालू की नको ..? लक्षात नाही तू घातले होतेस का?
पुढे लिहिलंय, ‘काल तर प्रेक्षकांना मधनं गर्दीत एकाचा खून झाला. खूप वाईट वाटलं ऐकून . पण तुझी ती भन्नाट अश्लील अदाकरी बघायला कोणाला नाही आवडणार. अभी तो पिचर बाकी हैं…!! आम्ही आपले बसलोय अदाकारीची शिबीर करत, प्लीझ मला हे सगळं शिकावं अल्बम मध्ये केलंय थोडंसं (कटा कीरर्रर्र ) ते ही आयटम साँग म्हणून. पण स्टेज वर नाही केल कधी. मला तुझी शिष्य बनवशिल का??कारण आम्हाला ही जगायच आहे . कलेनी पोट भरत नाही हे कळून चुकलंय, घुंगरू, शालू.. विकणे आहे .. प्लीझ मेसेज करा. पोटासाठी नाचते मीं परवा कोणाची … लव्ह यू गौतमी!’ या पोस्टनंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना मेघा ताईच्या संतापाचे समर्थन केले आहे.
Discussion about this post