Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मुलगी शिकली प्रगती झाली, जास्त शिकली…’; ललित प्रभाकरची ‘जिगरवाल्या बॉस’साठी खास पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 8, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Lalit_Kshiti
0
SHARES
211
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता ललित प्रभाकर सध्या सगळीकडे चर्चेत आहे. कारण लवकरच त्याचा ‘सनी’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात तो मध्यवर्ती भूमिकेत असून अतिशय वेगळी मात्र लक्षवेधी भूमिका तो साकारतो आहे. लांब गेल्यावरच जवळच सापडत म्हणतात ना.. त्याच भावनेचा प्रत्यय या सिनेमातून येणार आहे. त्यामुळे ललिताचा हा चित्रपट कधी एकदा रिलीज होतो अशी उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये आहे. त्याआधी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या सनीने त्याच्या बॉससाठी लिहिलेली एक खास पोस्ट मात्र चर्चेचा विषय बनली आहे.

View this post on Instagram

A post shared by @lalit.prabhakar

अभिनेता ललित प्रभाकर गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर अतिशय सक्रिय दिसतो आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘सनी’ बघता भेट रिलीज होईल. त्याआधी तो प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान त्याने सनीची बॉस आणि सनी चित्रपटाची निर्माती अभिनेत्री क्षिती जोगसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने क्षितीसोबतचे काही फोटो शेअर करत एक भन्नाट कॅप्शन दिले आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे कि, ‘मुलगी शिकली प्रगती झाली, जास्त शिकली प्रोड्यूसर झाली.’

View this post on Instagram

A post shared by @lalit.prabhakar

आता असं कॅप्शन त्याने लिहिण्याचं कारण काही वेगळं सांगायला नकोच. कारण अभिनेत्री क्षिती जोग ‘सनी’ चित्रपटाची निर्माती आहे. तर तिचा नवरा आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता हेमंत ढोमे हा या चित्रपटाचा दिग्दर्शक. या जोडीने आतापर्यंत अनेक कमाल चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. ज्यामध्ये ‘झिम्मा’ या चित्रपटाचाही समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by @lalit.prabhakar

तूर्तास आगामी चित्रपट ‘सनी’मध्ये घरापासून लांब जाऊन शिकणाऱ्या सनीची ओळख अनेक अनोळखी लोकांसोबत होते. कोर्सची फी भावाने भरली पण मौज मजेसाठी खर्च कसा करायचा..? म्हणून सनी एका कॅफेमध्ये काम करू लागतो. ज्या कॅफेची मालकीण अर्थात त्याची बॉस वैदेही म्हणजेच क्षिती जोग दाखवली आहे. हा चित्रपट अतिशय आपलासा वाटणारा असून १८ नोव्हेंबरपासून आपल्या भेटीला येत आहे.

Tags: Instagram PostKshiti JogLalit PrabhakarUpcoming Marathi Movieviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group