हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या घरातली एक प्रक्रिया जी कीतीही सीजन येउदे.. बदलणार नाही. ती म्हणजे नॉमिनेशन. या प्रक्रियेत सदस्य एकमेकांना हातातून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करतात. या आठवड्याचे नॉमिनेश कार्य सोमवारी पार पडले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ‘विषय END’ हे नॉमिनेशन कार्य देण्यात आले होते. ज्यामध्ये या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी यशश्री, स्नेहलता, प्रसाद, रुचिरा, अमृता धोंगडे आणि तेजस्विनी हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
अक्षय आणि टीम B ने मिळून रुचिराला नॉमिनेट केले. यानंतर आज रुचिरा आणि तिचा मित्र रोहित यांच्यामध्ये तसेच अपूर्वा आणि समृद्धी यांच्यामध्ये झालेल्या नॉमिनेशनवरून बरीच चर्चा रंगताना दिसणार आहे. ज्यामध्ये कुठेतरी रुचिरा आणि अपूर्वामध्ये कोल्ड वॉर सुरु झाल्याचे दिसून येईल. एकीकडे अपूर्वा समृद्धीला सांगताना दिसणार आहे कि, ‘माझ्या आणि प्रसादच्या बाचाबाचीमध्ये मी देशमुखला काय म्हणाले यापासून लांब रहा. विषय माझा आणि त्याचा आहे आम्ही ते बघून घेऊ. तुला विचारलंय का..? तुझा मुद्दा आला की आपण बोलू. मग तसं मी आदराने बोलले की, ‘तुम्ही दोघ बोलून घ्या जेव्हा तुमचं होईल तेव्हा मला सांग. मी तिला काय बोलले रात्री, तुला बोलावंस वाटलं कि सांग मला.. पण आता नाही… मला झोप येते आहे आपण उद्या बोलू.’
तर दुसरीकडे रुचिरा रोहितसोबत बोलताना म्हणाली कि, ‘जो निकष दिलाच नव्हता, त्या नसलेल्या निकषावर त्यांनी मला नॉमिनेट केलं आहे अरे..’. ‘नेहमी रुचिरा संयम ठेवेल… माझा संयम काढताना ती एक वाक्य म्हणाली.. माझ्यात संयम नव्हता. तुझा संयम संपला आहे, माझा संपला नाहीये संयम.. पण माझा क्रमशः संपतो आहे’. हे सगळं तुचीर संतापात अपुर्वाबद्दल बोलते आहे. तसेच अपूर्वा समृद्धीला सांगताना दिसणार आहे कि, ‘जेव्हा मी नॉमिनेट झाले होते तेव्हा किती लोकं आली होती. केवढे लोकं येऊन बोलले होते माझ्या बाजूने. मी माझ्या प्रॉब्लेमला केलं ना डील माझं-माझ.’ तेव्हा समृद्धीने अपूर्वाला लगेच म्हटले कि, ‘सगळेच करतात मी पण केलं.’
Discussion about this post