हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीचा अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉस १६चा प्रेक्षक वर्ग फार मोठा आहे. या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली अर्चना गौतम गेल्या काही दिवसांपासून शोची राणी म्हणून संबोधली जात आहे. पण आता राणीला त्या गोष्टीचा गर्व झालाय का काय..? असेच वाटू लागले आहे. कदाचित हाच गर्व उतरविण्यासाठी बिग बॉसने अर्चना गौतमला घरचा रस्ता दाखवला आहे. तूर्तास सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातम्यांनुसार अर्चनाला बिग बॉसने घरातून मध्यरात्री हाकलल्याचे समोर आले आहे. यात किती तथ्यता आहे हे आजच्या भागात कळेलच.
साऊथची सनी लियोनी अर्चना गौतम बिग बॉस १६च्याघरातील अत्यंत सक्रिय स्पर्धक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तीच बोलणं, वागणं ज्या पद्धतीने बदललं आहे ते पाहून प्रेक्षकांनाही ती खटकू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना गौतमचं आणि शिव ठाकरेचं अतिशय मोठं भांडण झालं आणि या भांडणा दरम्यान तिचं रागावरचं नियंत्रण सुटलं. तिने शीवच्या थोबाडात मारली आणि यामुळे अख्ख घर तिच्या विरोधात गेलं आहे. बिग बॉसचा मुख्य नियम तोडल्यामुळे तिला बिग बॉसने घराबाहेर काढल्याचे बोलले जात आहे.
काही माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, अर्चना आणि शिवचं भांडण रात्री झालं आणि हे भांडण चांगलाच जोरदार वाजलं. या वादात अर्चना थेट शिवच्या अंगावर धावून गेली आणि मारामारीवर उतरली. यावेळी तिने शीवच्या थोबाडात देखील मारली आणि हिंसा न करण्याचा मुख्य नियम मोडला. यामुळे अर्ध्या रात्री म्हणजे ३ वाजता तिला बिग बॉसने घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पण यामुळे अर्चनाचे चाहते मात्र चिंतेत आहेत. तिचे सारे चाहते तिला पाठिंबा देत असून तिला घरातून काढू नका अशी मागणी करत आहेत. याशिवाय या विकेंडला डबल एव्हिक्शन होणार असून याबाबत अद्याप मेकर्सने अधिकृत माहिती दिलेली नाही.
Discussion about this post