हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीच्या बिग बॉस १६चा गुरुवारी प्रसारित झालेला भाग अतिशय हेक्टिक होता. या भागात शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्यात असा काही राडा झाला कि याचा परिणाम म्हणून अर्चनाला बिग बॉसला रामराम म्हणावं लागलं. एका छोट्या मुद्द्याचा गंभीर विषय झाला आणि सगळ्यांची भाषा बदलली. पण या सगळ्यात अर्चनाचा राग इतका अनावर झाला कि ती मारामारीवर उतरली. या नादात शिवला काहीशा जखमा झाल्या आणि परिणामी मुख्य नियमाचे उल्लंघन केल्यामुळे बिग बॉसने तिला घराबाहेरचा रस्ता दाखवला.
बिग बॉसच्या घरात टिश्यूचा मुद्दा इतका मोठा झाला कि, अर्चना पुन्हा तिच्या भाषेवर उतरली. अर्चनाला टिशूचे बॉक्स द्यायचे नव्हते आणि ते टीना घेऊन गेली म्हणून रागारागात तिने चुकीच्या शब्दांचा वापर केला. हे शब्द ऐकून शिवची सटकली आणि तो काय म्हणालीस..? असे तिला वारंवार विचारू लागला. यावरून ती मला तुझ्याशी बोलायचं नाही.. तुझा इथे संबंध नाही.. निघ नाहीतर रेपटा (कानाखाली) मारेन असे म्हणू लागली. पण शिव काही हटेना. ज्यामुळे अर्चनाचा राग अनावर झाला आणि तिने त्याचा गळा धरला. ज्यामुळे तिची नखं शीवच्या मानेवर लागली. शिवाय तिला बाकीच्या सदस्यांनी मागे ओढलं असता शीवच्या हातालाही तिची नखं लागली. यामुळे बिग बॉसने तिला मध्यरात्रीच घराबाहेर हो असे आदेश दिलॆ.
यानंतर आज शुक्रवार का वार’मध्ये सलमान खान घरातल्यांचा क्लास घेताना दिसणार आहे. यावेळी तो शिव आणि अर्चनाच्या भांडणातील काही मुद्दे अधोरेखित करताना दिसणार आहे. तसेच अर्चनाच्या कृत्यावर संताप दर्शवेलच पण शिवलाही फाटकारताना दिसणार आहे. तसा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी सलमानला ट्रोल करू लागले आहेत. जर शिवलाच दोष द्यायचा असेल तर घरात मारामारी करण्याची परवानगी देऊनच टाका असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. आता उत्सुकता हीच आहे कि, आजच्या भागात सलमान नेमकी काय भूमिका घेतो.
Discussion about this post