हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहिले आहेत आणि याचे कारण होते बिपाशाची प्रेग्नेंसी. अखेर तो सुवर्ण दिन आज उजाडला आहे आणि बिपाशाने एका गोड चिमुकल्या परीला जन्म दिला आहे. करण आणि बिपाशाला आपलं पहिलं बाळ मुलगी असावी असे वाटत होते आणि देवाने त्यांची हि इच्छा पूर्ण केली आहे. हि आनंदाची बातमी सोशल मीडियावर समजताच त्यांचे चाहतेही अत्यंत आनंदी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिपाशाने काही वेळेपूर्वीच बाळाला जन्म दिला असून तिला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. मुख्य म्हणजे बिपाशा आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बिपाशा आणि करण त्यांच्या पहिल्या बाळाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांची उत्सुकता ते नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसले. प्रेग्नेंसीची न्यूज देण्यापासून ते विविध मॅटर्निटी शूट, बेबी शॉवर, बेबी केअर अशा विविध पोस्टच्या माध्यमातून बिपाशा आणि करण नेहमीच आई आणि बाबा होण्या बाबतचा आनंद व्यक्त करताना दिसले.
बिपाशा आणि करण यांनी २०१६ साली लग्न गाठ बांधली. मात्र हे दोघेही आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांनी फॅमिली प्लॅनिंग थोडं लांबणीवर टाकलं होत. लग्नानंतर तब्बल ६ वर्षांनी त्यांनी बाळाचा विचार केला आणि बिपाशा प्रेग्नेंट राहिली. यानंतर त्यांनी हि प्रेग्नंन्सी मिळून अनुभवली आणि आज बिपाशा आई तर करण बाबा झाला आहे. बिपाशाच्या प्रेग्नेंसीची बातमी लीक झाल्यानंतर तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला आणि करणला मुलगी हवी आहे. त्यांच्या घरी मुलगीच जन्माला यावी, अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यांची ही इच्छा आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे ग्रोवर घरात तर आनंदी आनंद आहेच. शिवाय त्यांच्या चाहत्यांमध्येसुद्धा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Discussion about this post